Amit Shah Pune Visit
Amit Shah Pune Visit esakal
महाराष्ट्र

Amit Shah Pune Visit : देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा 42 टक्के - अमित शाह

सकाळ डिजिटल टीम

'अमित शाहांकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले आहेत. शाहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे.'

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहांचं (Union Home Minister Amit Shah) पुण्यात आगमन झालं आहे. आज बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं त्यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन करण्यात आलं.

पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित आहेत.

यावेळी संबोधित करताना अमित शाह म्हणाले, 'गेल्या 9 वर्षांत पंतप्रधान मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. 60 वर्षांपासून लोकांची जी स्वप्न होती, ती मोदींनी पूर्ण केली.'

आज आपण पाहिलं तर देश एका बाजूला अन् महाराष्ट्र राज्य एका बाजूला आहे. कारण, देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आल्याचं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी मी पहिल्यांदाच अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजितदादा तुम्ही आता योग्य जागेवर बसलात, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होतं, असंही त्यांनी मिश्किलपणे म्हटलं.

सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय - एकनाथ शिंदे

अमित शाहांकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले आहेत. शाहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे. शाहांनी एखादी गोष्ट ठरवली की ते करतातच. मोदी आणि शाहांमुळं देशात मोठे बदल होत आहेत. त्यांचं नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अमित शाहांकडून सहकारात मोठे बदल -फडणवीस

अमित शाहांकडून सहकारात मोठे बदल झाले आहेत. अमित शाहांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. अजितदादा म्हणाले ते महाराष्ट्राचे जावई आहेत. हे खरंय, पण त्यांचा जन्म मुंबईतला आहे. त्यांची कर्मभूमी गुजरात आणि दिल्ली असली तरी त्यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे. म्हणूनच ते महाराष्ट्राचा विचार अधिक करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT