Hingoli MLA Santosh Bangar esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : आमदार बांगरांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या 20 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

अमरावती : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Hingoli MLA Santosh Bangar) यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी (Shiv Sainik) हल्ला केलाय. यावेळी शिवसैनिकांनी 'पन्नास खोके एकदम ओके' अशी नारेबाजी केली. अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) अंजनगांव सुर्जी इथं हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेतून (Shiv Sena) बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. यावेळी शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिले.

संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी इथं येताच कार्यकर्ते वाहतांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते, त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला आणि ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘संतोष बांगर गद्दार है’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनावर थापा मारल्या. परंतु, सुरक्षा रक्षकानं धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते.

दरम्यान, या घटनेप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्याच्या आरोपात गुन्हे दाखल झालेले राजेंद्र अकोटकर, अभिजित भावे, महेंद्र दिपटे, गजानन विजयकर, गजानन चौधरी, रवींद्र नाथे, गजानन हाडोळे, मयूर रॉय, शरद फिसके यांनी सोमवारी दुपारी 1 वाजता आत्मसमर्पण केलं. आणखी पाच ते सहाजणांचा हल्लेखोरांमध्ये समावेश असल्याचं ठाणेदार वानखडे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT