Atul Bhatkhalkar  सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

"काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा सिनेमा काढण्याचा प्रयत्न केला तर .."

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत आहे मात्र काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटातून दर्शवण्यात आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत आहे मात्र काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला तर थिएटर चालकांना योग्य तो धडा शिकवू, असा स्पष्ट इशारा दिला.

अतुल भातखळकर ट्वीट करत म्हणाले, “काश्मीर फाईल्स हा सिनेमा तिकीट बारीवर धोधो बिजनेस करतोय, पण तरीही काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे सरकारच्या दबावामुळे हे सुरू आहे. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा हा सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला तर थिएटर चालकांना योग्य तो धडा शिकवू हे याद राखा.”

1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अनुपम खेर (Anupam Kher), दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.

‘द काश्मीर फाईल्स’ने शनिवारला पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 8.50 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने दोन दिवसांत 12.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. देशातील निवडक थिएटर्समध्येच हा चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा केलेली कमाई ही खूपच सकारात्मक आहे. महाराष्ट्रात काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार, अशी चर्चा सुरु आहे, त्यामुळे या चित्रपटावरुन वाद चिघळण्याचीही दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT