atul londhe atul londhe
महाराष्ट्र बातम्या

Phone Tapping Case : अतुल लोंढेंच्या निशाण्यावर तत्कालीन गृहमंत्री

सकाळ डिजिटल टीम

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. शासनाने फोन टॅपिंग प्रकरणात समिती नेमली होती. समितीने अहवाल दिल्यानंतर शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. रश्मी शुक्ला यांच्यासह तत्कालीन सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी माजी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे.

देशविरोधात कारवाया, अंमली पदार्थ्यांची तस्करी करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी फोन टॅपिंगची परवानगी घ्यावी लागते. कुठल्याही अधिकाऱ्याला फोन टॅपिंगचा परस्पर निर्णय घेता येत नाही. त्यासाठी गृहमंत्र्यांसह गृहखात्यातील अधिकाऱ्यांची (Take action against the then Home Minister) परवानगी घ्यावी लागते. तेव्हा पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना फोन टॅपिंग करण्याचे आदेश कोणी दिले याचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज आहे. हे गुजरातचे स्पाईन मॉडेल आहे. ते महाष्ट्रात खपवून घेतले जाणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल असेही अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole), बच्चू कडू, आशिष देशमुख यांचे नावे बदलवून फोन टॅपिंग करण्यात आले. हे सरळसरळ इंडियन टेलीग्राम ॲक्टचे उल्लंघन आहे. हे केवळ राजकारणासाठीच नव्हे तर तुमच्या आमच्यासाठीसुद्धा धोक्याचे आहे. यामुळे लोकशाहीसोबत वैयक्तिक स्वातंत्र्यालाही धोका आहे. भाजपच्या कार्यकाळात विरोधकांचे संभाषण लपून ऐकूण त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे स्पष्टपणे यातून दिसून येते.

सूत्रधार कोण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे

नाना पटोले यांनी आपले फोन टॅप केल्याचा आरोप यापूर्वी केला होता. त्यानुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालावरून रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांना फोन टॅप करण्याचे आदेश कोणी दिले होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या पूर्ण प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सांगितले.

परवानगी देणाऱ्याचा शोध घ्या

काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनीसुद्धा फोन टॅपिंगसाठी (Phone tapping) कोणाचे आदेश होते आणि कोणी परवानगी दिली होती याचा शोध घेण्याची सरकारकडे मागणी केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपतीशि शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे अनेकांनी कोश्यारी यांच्यावर टीका करीत राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा विश्वास गमावलेला आहे. राज्यपालांचे वर्तन घटनात्मक पेचप्रसंगाकडे जाताना दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुघल-इंग्रज, पोर्तुगीजांना पुसता आला नाही, असे म्हणत अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा ट्विटवर समाचार घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT