gofan article
gofan article esakal
महाराष्ट्र

गोफण | निमंत्रण मिळालं अन् ते खुश झाले...

संतोष कानडे

मातब्बर गडाचे राजे उधारराजे बागेतच झोपाळ्यावर पहुडले होते. आज त्यांचं मन संथपणे वाहणाऱ्या नदीसारखं स्थिर होतं. सगळ्या मागच्या-पुढच्या घडामोडींचा ते शांतपणे विचार करत होते. शत्रू गटाकडून होणारे अपमान, मित्रांनी दिलेले धोके आणि शत्रूंच्या शत्रूंबरोबर खुबीने केलेली मैत्री... सगळं त्यांच्या नजरेसमोरुन जात होतं. 'रात्रन् दिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असा येणारा काळ होता. त्यामुळे सावध रहावं लागणार होतं. शत्रूगटाकडून वारंवार होणाऱ्या हल्लामुळे त्यांच्या गडाची बऱ्यापैकी पडझड झालेली होती.

झोपाळ्यावर झुलत असताना अचानक कुणीतरी येत असल्याची चाहूल त्यांना लागली. बागेतल्या पाचोळ्यावर झपाझप पडणारी वजनदार पावलं ऐकून उधारराजे ओरडले.. ''कोणंय रेS.SS..'' तसा जवळ येऊन थांबलेला इसम बोलला. ''राजे मी सांडणीस्वार..''

''कोण.. कोण? कसला स्वार?'' उधारराजेंच्या प्रश्नाला तेवढ्याच लगबगीनं त्याने उत्तर दिलं- ''खलिताबहाद्दुर ... जावू द्या, पोस्टमन.. पोस्टमन!''

''असंय होय.. तसं सांग ना मग! पाचशे वर्षांपूर्वीचं पत्र घेऊन आल्यासारखं का बोलायला?'' तसा तो पोस्टमन बोलता झाला- ''त्याचं कारणबी तसचंय राजे. पाचशे वर्षांपूर्वी बिघडलेली गोष्ट दुरुस्त झाल्याचा सांगावा घेऊन आलोय..''

हे ऐकून उधारराजे चमकले, ''काय-काय.. काय म्हणतो? काय बिघडलं होतं? काय दुरुस्त केलं?''

पोस्टमन बोलला, ''ते जाऊ द्या.. बात निकलेगी तो दूर तक जाएगी.. तुम्ही तुमचं पत्र घ्या. नाहीतर मीच वाचून दाखवतो''

उधारराजेंना जरा संशय आला पण डोळे जड पडले होते, त्यामुळे त्यांनी उघडचे नाहीत.. फक्त बोलले- ''अरे पोस्टमना, तुझा आवाज ऐकल्यासारखा वाटतोय रे.. काय, नाव काय तुझं?''

तसा पोस्टमन घाबरला.. आवाज आपोआप जड झाला होता. म्हणाला, ''मा..माझा आवाज. छेछे.. हंहं.. मीच येतो ना नेहमी पत्र घेऊन. म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल''

''बरं बरं.. असू दे असू दे. काय पत्र आणलंय ते वाच..''

उधारराजेंनी अजूनही डोळे उघडले नव्हते. डोळे उघडून त्यांनी पोस्टमनकडे बघितलं असतं तर त्यांना धक्काच बसला असता. कारण तो पोस्टमन सर्वसामान्य पोस्टमनसारखा हडकुडा नव्हता. भलीमोठी ढेरी, लुसलुशीत गाल, वैशिष्ट्यपूर्ण हास्य... कदाचित पोस्टमनकडे बघून 'पुन्हा येईन' म्हणणाऱ्या कुण्या नागपूरकर नेत्याचीच त्यांना आठवण आली असती. पण त्यांनी डोळे उघडलेच नव्हते.

पत्र वाच म्हटल्यानंतर ते खात्यापित्या घरातले पोस्टमन पत्र वाचायला लागले-

माननीय श्री. उधारराजे कोट्याकरे

मात्तबर गड, मुंबापुरी

अयोध्या में प्रभू श्रीराम पधार रहें हैं.. आपका प्रभू के प्रति प्यार बढे इसलिए आपको आमंत्रण देने का प्रयोजन हैं | आप आए तोभी ठीक हैं.. न आए तोभी ठीक हैं |

आपका,

नमोभाई विश्ववंद्ये

पत्र ऐकून उधारराजेंचे डोळे खाडकन् उघडले. डोळ्याची पापणी पडत नव्हती.. डोळे लालबुंद झाले, दातावर दात रगडल्याने कर्..कर्.. आवाज यायला लागला.. शरीरातल्या शिरा ताणल्या गेल्या.. तशाच अवस्थेत ते उठून बसले. नजर फक्त शुन्यात होती. बाजूच्या पोस्टमनकडेही त्यांनी बघितलं नाही. वटारल्या डोळ्यांनी उधारराजे वातावरणात बघत होते. पोस्टमनला हीच तर मजा बघायची होती.

उधारराजे ताडकन् उठले. पोस्टमनकडे ढुंकूनही न बघता बंगल्याकडे पळत सुटले... 'जय श्रीराम..जय श्रीरामSS.. रामलल्ला की जय हो..!' असा जयघोष करीत उधारराजे बंगल्याच्या दारातून आत गेले. पोस्टमन पुरता बावचळून गेला होता. ''काय झालं ह्यांना?'' असं म्हणत त्याने काढता पाय घेतला. निमंत्रण मिळाल्याच्या आनंदात उधारराजेंनी रात्र जागून काढली होती. ते पत्र त्यांनी हृदयाशी कवटाळून उर अभिमानाने भरवून काढला होता.

पत्र आल्यामुळे देशात आपली किती इमेज आहे, आपल्याला टाळून त्यांना काहीच करता येणार नाही... अशा भावना उधारराजेंना मनात दाटून आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे जीवलग मित्र बोलभांडे रौत यांच्यासोबत त्यांची बैठक ठरली होती. त्याच बैठकीत या पत्राचा खरा अर्थ उमगणार होता..

समाप्त!

santosh.kanade@esakal.com

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन मागील 'गोफण' सदर वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT