bacchu kadu on Amit Shah lying in Lok Sabha about kalavati bandurkar rahul gandhi Parliament Monsoon session 2023  
महाराष्ट्र बातम्या

Kalavati Bandurkar Issue : अमित शाह लोकसभेत खोटं बोलले, हा मोठा चिंतेचा विषय! भाजपला नेत्याचा घरचा आहेर

रोहित कणसे

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या देशात गोंधळ सुरु आहे. २००८ मध्ये राहुल गांधी भेटलेल्या कलावती बांदूरकर नावाच्या महिलेबद्दल अमित शाह खोटे बोलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यानंतर भाजपला या प्रकरणी घराचा आहेर मिळाल्याचे पाहयला मिळत आहे.

कलावती यांच्या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत खोटं बोलले अशी प्रतिक्रिया एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी दिली आहे. अमित शाह यांनी खोटं बोलणं चिंतेचा विषय असून यामुळे भाजपचंच नुकसान होणार असल्याचे देखील कडू म्हणाले आहेत.

काल संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केल्याचा दावा केला होता. मात्र कलावती यांच्याकडून अमित शाह यांचा दावा फेटाळण्यात आला. आपल्याला भाजपकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. यानंतर बच्चू कडू यांनी आज प्रतिक्रिया दिली.

अमित शाह यांनी वेगळीच स्टोरी बनवली आहे. त्यांनी उत्तराखंडमधील कुठलंतरी गावाचं नावं घेतलं. तेथे कलावतीच नाहीये, ती महाराष्ट्रात आहे. अमित शाह यांन मुद्दा उचलला पण तो तेवढ्याच जोरात आपटला. म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला असा तो प्रकार झाला.

कलावती बांदूरकर सांगत आहेत की, काँग्रेसने मदत केली आणि अमित शाह म्हणत आहेत की आम्ही मदत केली. एवढ्या लहान मुद्द्यावर त्यांनी (अमित शाह) लोकसभेत बोलावं आणि तेही खोटं बोलावं हा मोठा चिंतेचा विषय आहे, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT