bjp party esakal
महाराष्ट्र बातम्या

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

BJP’s Statewide Success Faces Setback in Ratnagiri : जाणून घ्या, अशी कोणती जिल्हापरिषद आहे, जिथे भाजची कामगिरी खराब झाली आहे.

Mayur Ratnaparkhe

BJP performance in Ratnagiri Zilla Parishad : जिल्हापरिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. समोर आलेल्या निकालांनुसार दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यात भाजपच सर्वाधिक जागा जिंकून अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. एवढंच नाहीतर, भाजपने २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीचाही रेकॉर्ड मोडल्याचे खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी मीडियासमोर सांगितलंय.

मात्र असं जरी असलं तरी राज्यात एक असाही जिल्हा आहे, जिथे भाजप थेट चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. होय, रत्नागिरी जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला फारसे यश मिळालेले नसल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जबरदस्त कामगिरी बजावत तब्बल ४० जागा जिंकून एकहाती मोठा विजय मिळवला आहे. तर या ठिकाणी, भाजपला अवघ्या चार जागा जिंकता आल्या असून आणि चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण ५६ जागा आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहा जागा जिंकता आल्या आहेत तर,  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. यानंतर चार जागांसह भाजपचा नंबर लागला आहे.

तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघी एक जागा जिंकता आली आहे. त्याही पेक्षा खराब कामगिरी काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाची या ठिकाणी पाहायाला मिळाली आहे. या दोन्ही पक्षांना त्यांचे खातेही उघडता आलेले नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ५५.७९ टक्के मतदान झाले होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३८ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होत्या. त्यापैकी १८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. १५ जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून यामध्ये ८ महिलांसाठी राखीव होत्या. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT