Chandrashekhar Bawankule recalls Atal Bihari Vajpayee after BJP’s success in Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Maharashtra.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

Bawankule on BJP Victory :राज्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.

Mayur Ratnaparkhe

Chandrashekhar Bawankule on BJP Victory in Zilla Parishad Elections : राज्यातील जिल्हापरिषद आण पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. सर्वाधिक जागा जिंकून राज्यात भाजप पुन्हा एकदा अव्वल पक्ष ठरला आहे. तर या निवडणुकीत भाजपने २०१७मधील स्वत:चा विक्रम मोडल्याचेही खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी मीडियासमोर सांगितल आहे.

भाजपच्या या यशामुळे राज्यभरात भाजप नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण आहे. तर या विजयानंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याची सर्वांना आठवण करून दिली आहे. चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘’भाजपा का कार्यकर्ता,  कभी हारता नही है। वो जितता है, या फिर सीखता है..‘’ श्रद्धेय अटलजींचे हे अजरामर विधान..! जिल्हापरिषद, पंचायत समित्यांचे आजचे निकाल याच महावाक्याची आठवण करून देते.

विधानसभा, नगरपरिषद, महानगरपालिका आणि आज जिल्हा परिषद, पंचायत समितीचे निकाल भाजपा कार्यकर्त्यांच्या समर्पणाची साक्ष देत आहेत. या सर्व निवडणुकीत भाजपा महायुतीने अभूतपूर्व यश मिळविले. १५० ठिकाणी नगराध्यक्ष, २५ ठिकाणी महापौर आता जिल्हापरिषदेत आठ ठिकाणी महायुतीने विविधतेतून एकतेचा संदेश दिला.

 भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीत यश मिळविण्यासाठी झटत होता. ५१ टक्के मत भाजपाच्या पारड्यात पडल्याचे दिसून येते. आजचे यश कार्यकर्त्यांचे आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. विजयी झालेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. अभिनंदन करतो.

तसेच, पंचायत ते पार्लमेंट हा केवळ एक नारा नाही, तर इच्छाशक्तीचे प्रतिबिंब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्रुवनेतृत्व, मार्गदर्शन व नियोजन तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रोत्साहन यामुळेच आजचे यश मिळू शकले. हा विजय महाराष्ट्रातील जनतेने दिलेला सकारात्मक कौल आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्रासाठी ग्रामीण भागातील मायबाप जनतेने दिलेली ही समर्थ साथ आहे. जनतेचे, मतदारांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या प्रत्येक मताचे आमच्यावर ऋण आहेत. असं बावनकुळेंनी म्हटलंय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ताई यांच्यासह मी पुनःश्च सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचे अभिनंदन करतो. आभार मानतो. असेच प्रेम, साथ आणि प्रोत्साहन असू द्या. जय महाराष्ट्र..असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT