Raghunath Patil Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

तुमचे मंत्री परराज्यात गेलेत, परत येण्याची चिन्ह दिसत नाहीत; असं का म्हणाले पाटील?

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे.

Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकारमधील (Thackeray government) मंत्री आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे.

शिंदे गटासोबत गेलेले आमदार आपण असा निर्णय का घेतला, याबाबत व्हिडिओ तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. पाटील म्हणाले, उशिरा का होईना पण आई भवानीच्या कृपेनं महाराष्ट्रात पाऊस आला आहे. अशातच तुमचे मंत्री परराज्यात गेले आहेत. त्यास आठवडा उलटला तरी परत येण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळं आता त्या सर्व मंत्र्यांची खाती तुमच्याकडं घेऊन मंत्रालयात बसून, सर्व खात्यांचा कारभार व्यवस्थित करावा, अशी विनंती रघुनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलीय.

विशेषत: कृषी खातं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेऊन राहिलेली कर्जमाफी, तसेच 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावं, असंही पाटील म्हणाले. दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी पेरणीची काम सुरु आहेत. पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. तसेच मुलांच्या शाळा सुरु होत आहेत. त्यासाठीही शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. त्यामुळं आमच्या विनंतीस मान देऊन 1 जुलै 2022 पर्यंत या गोष्टी पूर्ण कराव्यात, अशी विनंतीही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT