Chitra Wagh and Nana Patole
Chitra Wagh and Nana Patole 
महाराष्ट्र

काही घडलं की आम्हाला प्रश्न विचारतात, मग मीही नानांना प्रश्न विचारला : चित्रा वाघ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांचे महिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्षांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचं नाव घेत एक व्हिडीओ शेअर करून खोचक सवाल केला आहे. ( Chitra Wagh and Nana Patole news in Marathi)

लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात वावरत असताना काळजी घ्यायला हवी. नाना पटोले यांचा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला. माझ्याकडे तो व्हिडीओ आल्यावर मी प्रश्न उपस्थित केला. तसेच राज्यात काही घडलं की आम्हाला प्रश्न विचारण्यात येतो. मग मीही नानांना पटोलेंना प्रश्न विचारल्याचं चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

भाजप असो वा सर्वच राजकीय पक्ष, मागील आठ दिवसांत बरेच प्रश्न विचारण्यात आलं. ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. पक्षाला विचारण्यात आलं. हे चुकीचं आहे. पक्ष कधीही अस करण्यास सांगत नाही. मग विचारतात चित्रा ताई तुम्ही शांत का ? या सर्व घडामोडीनंतर नानांचा व्हिडीओ समोर येणं धक्कादायक असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. त्यामुळे आपण प्रश्न विचारल्याचं वाघ यांनी म्हटलं.

कोणताही पक्ष असो वा नाना पटोले असो तुम्ही लोकप्रतिनीधी असता तेव्हा तुमची जबाबदारी वाढलेली असते. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आम्ही तत्काळ दखल घेत राजीनामे घेतले. त्यामुळे आपण सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळतील, शरद पवारांनी वर्तवला अंदाज

Healthy Diet: पौष्टिक पदार्थांचा अभाव हे अनेक आजारांचं कारण; ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं कशी असावी रोजची थाळी?

Mumbai Indians : मुंबईसाठी कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात हार्दिक पांड्या अपयशी! नावावर केला लज्जास्पद विक्रम

Kolhapur Lok Sabha : वाढला मतदानाचा टक्का, कोणाला बसणार धक्का; 'या' मतदारसंघातील मतदान ठरणार निर्णायक

SCROLL FOR NEXT