Eknath Shinde Almatti Dam
Eknath Shinde Almatti Dam esakal
महाराष्ट्र

Eknath Shinde : अलमट्टी धरणामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती..; CM शिंदेंनी दिल्या महत्वाच्या सूचना

सकाळ डिजिटल टीम

आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने येथील गरोदर महिलेला वेळेत दवाखान्यात पोचवण्याचे कौतुकास्पद काम केले होते. त्यासोबत आम्हीही तिथेच होतो.

कोल्हापूर : ‘अलमट्टी धरणामुळे (Almatti Dam) कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होवू नये, यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या यंत्रणेशी संपर्क-समन्वय ठेवावा. यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन त्याचे सूक्ष्म नियोजन करावे.

धरणांमधील पाणी नियंत्रित ठेवले पाहिजे. लोकांना स्थलांतरित व्हायला लागू नये यासाठी आतापासूनच काळजी घ्यावी’, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातसह कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक़ घेतली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या पुरावेळी मी स्वत: बचाव कार्यात होतो. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने येथील गरोदर महिलेला वेळेत दवाखान्यात पोचवण्याचे कौतुकास्पद काम केले होते. त्यासोबत आम्हीही तिथेच होतो. दरम्यान, यावर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होवू नये यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय ठेवावा. धरणांचे पाणी नियंत्रित ठेवावे. लोकांना स्थलांतरित व्हावे लागू नये, यासाठी आतापासून जलसंपदा विभागाने योग्य आणि काळजीपूर्वक नियोजन करावे.’

ते पुढे म्हणाले, ‘पावसाळ्यात जलसंपदा विभागाचे महत्वाची भूमिका असते. जिल्ह्यात भूस्खलन, दरडी आणि जमिनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींबाबत या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना तत्काळ दिल्या पाहिजेत. पूरस्थिती निर्माण होवू नये, नागरिकांचे स्थलांतर होवू नये याची काळजी घेण्यासाठी कर्नाटक सरकारशी योग्य तो समन्वय साधला पाहिजे.'

पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. त्यांच्याकडून सातत्याने कर्नाटकशी संपर्क साधला पाहिजे. वेळोवेळी पूरस्थितीची माहिती आणि खबरदारी घेण्याबाबत सूचना करावी.’ यावेळी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT