Desi Daru Vs English Wine  esakal
महाराष्ट्र बातम्या

Desi Daru Vs English Wine : देशी दारू आणि ब्रँडेड दारू यात विशेष फरक नाही… फक्त याच एका कारणामुळे ती महाग होते

जेव्हा जेव्हा दारूचा प्रश्न येतो तेव्हा लोक देशी दारू पिण्यास नकार देतात

सकाळ डिजिटल टीम

Desi Daru Vs English Wine : जेव्हा जेव्हा दारूचा प्रश्न येतो तेव्हा लोक देशी दारू पिण्यास नकार देतात, परंतु इतर लोक व्हिस्की, वाईन, टकीला अगदी आवडीने पितात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की या दोघांमध्ये काही विशेष फरक नाही आणि ते एकाच पद्धतीने बनवले गेले आहेत.

देशी दारू आणि इंग्रजी मद्य यातील फरक किंवा ते बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेण्याआधी, आधी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ते कोणत्याही स्वरूपात सेवन करणे चुकीचे आहे. पण ज्यांना दारू पिण्याची सवय आहे, त्यांना देशी दारू पिणे आवडत नाही, तर इंग्रजी दारू पिणे पसंत करतात. 

पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशी दारू आणि इंग्रजी मद्य यात काही विशेष फरक नाही आणि दोन्ही सारख्याच प्रकारे बनवल्या जातात. असेही म्हणता येईल की लोक देशी दारू इंग्रजी दारूच्या रूपात पितात आणि त्यात थोडा फरक आहे.

देशी दारू आणि इंग्रजी दारू बद्दल जाणून घेण्याआधी देशी दारू म्हणजे काय हे जाणून घेऊ.

देशी दारूला कंट्री लिकर किंवा IMCL म्हणजे इंडिया मेड कमर्शियल लिकर म्हणतात. त्याचबरोबर इंग्रजी दारूच्या नावाने भारतात विकल्या जाणाऱ्या दारूला IMFL म्हणजेच इंडिया मेड फॉरेन लिकर म्हणतात. विशेष म्हणजे जी परवानाधारक दुकानात मिळते ती देशी दारू देखील सरकारी नियमांचे पालन करून बनविली असते. ही देशी दारू हे इंग्रजी मद्याचे प्रारंभिक रूप आहे. या दोन्ही मधलं फरक जाणून घेण्यासाठी देशी दारू आणि इंग्रजी दारू कशी बनते हे जाणून घेऊ, त्यानंतर आपल्याला या दोघांमध्ये काय फरक आहे हे चांगले समजू शकेल.

देशी दारू कशी बनते?

तसे पाहिलं तर देशी दारू आणि इंग्रजी दारू बनवण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. देशी दारू हा एक प्रकारचा शुद्ध स्पिरीट किंवा डिस्टिल्ड आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त देशी दारू कंपन्याच हा स्पिरिट इंग्रजी दारू कंपन्यांना पाठवतात. ज्यावरून तुम्ही समजू शकता की इंग्रजी मद्य बनवणाऱ्या कंपन्या देखील देशी कंपन्यांकडूनच दारू बनवण्यासाठी बेसिक लिक्विड खरेदी करतात.यानंतर त्यात फ्लेवर्स वगैरे टाकून इंग्रजी दारू बनवली जाते. 

देशी दारू डिस्टिल्‍ड अॅग्रिकल्चरल सोर्सपासून बनवली जाते, ते या दारूच्‍या बाटलीवर देखील नमूद केले असते.  यात तांदूळ, बार्ली इ. यापासून एक द्रव तयार केला जातो, जो अल्कोहोल बनवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय देशी दारूमध्ये कोणत्याही चवीचे मिश्रण नसल्यामुळे ते साधे असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला सरकारकडून कर लाभ मिळतो आणि भारतात त्याची विक्री खूप जास्त आहे.

इंग्रजी वाईन कशी बनवली जाते?

इंग्रजी मद्य म्हणजे फॉरेनची व्हिस्की वगैरे भारतात बनते, पण त्याची प्रक्रिया आपल्या इथे वेगळी आहे. सर्वप्रथम या कंपन्याकडून देशी दारूपासून बनवलेल्या स्पिरीट्स इत्यादी विकत घेतल्या जातात, म्हणजेच इंग्रजी मद्य ही देशी दारूपासूनच मिळते. यानंतर स्कॉटलंडचा स्कॉच त्यात वेगवेगळ्या प्रमाणात मिसळला जातो आणि त्यात काही फ्लेवर्स टाकले जातात. ते मिक्स केल्यावर त्याला व्हिस्की वगैरेचा चेहरा मिळतो. म्हणजेच देशी-विदेशी दारू बनवण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे.

विशेष म्हणजे त्यात इतर काही वेगळ्या  गोष्टी टाकल्याने त्याचे अल्कोहोलचे प्रमाणही वाढते आणि ते ४० टक्क्यांहून अधिक पोहोचते. याशिवाय त्याचे पॅकिंगही वेगळे आहे. अशावेळी पॅकिंग, अल्कोहोल, स्कॉच किंवा फ्लेवर वाढल्याने त्याची किंमतही वाढते. यासोबतच इंग्रजी मद्यावरही सरकार खूप जास्त कर घेते आणि त्यामुळे त्याची किंमत खूप वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT