Ashish Shelar
Ashish Shelar esakal
महाराष्ट्र

शरद पवार मोठे नेते, 'तसं' वक्तव्य करणं चुकीचं : आशिष शेलार

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आलीय.

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकाममंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील ईडी चौकशीवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. एकामागून एक राजकीय प्रतिक्रिया सुरु असतानाचा आता भाजपतर्फे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शेलार यांनी शरद पवार यांना टोला लगावलाय. शरद पवारसाहेब (Sharad Pawar) मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, असं वक्तव्य शेलार यांनी केलंय. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादीनं (Shiv Sena-NCP) तपास यंत्रणांवर दबाव आणू नये. आपल्या सरकारला, पक्षाला वाचविण्यासाठी यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून सुरुय. तपास यंत्रणा लवकरच सत्य बाहेर काढेल, असा माझा ठाम विश्वास आहे. ईडीची कोणतीही कारवाई झाली, तर प्रत्येकजण भाजपलाच जबाबदार धरत आहे, हे चुकीचं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आतंकवाद्यांचं समर्थन करत आहे का, हेही सांगावं. आतंकवाद्याला कोणताही जात-धर्म नसतो, त्यामुळं या दोन्ही पक्षांनी ठरवावं, असंही शेलार म्हणाले.

कारवाईचं कोणतंही आश्चर्य वाटतं नाही : शरद पवार

एकीकडं शरद पवारांनी मलिकांवरील कारवाईचं कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडं शेलार यांनी पवारांना टोला लगावलाय. पवार साहेब एवढे मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, पण सामान्य माणसाला कळतं, एवढ्या मोठ्या नेत्यांनी यापासून आपल्याला वाचवलं पाहिजे, एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत: ला जोडणं योग्य नाही, असं म्हणत त्यांनी पवारांना उद्देशून म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आलीय. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिकांना ईडी कार्यालयात नेण्यात आल्याचं वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी (ED) आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरूय. दरम्यान, राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना चौकशीसाठी ईडीनं समन्स पाठवले होते. नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर भाष्य करत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मलिकांना 'मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी', असं म्हणत जोरदार टोला हाणलाय.

भाजप नेते शेलार यांनी ट्विटव्दारे मंत्री मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. शेलारांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी! ज्यानं खीर खाल्ली नाही, त्यानं घाबरण्याचं कारणही नाही; पण ज्यानं-ज्यानं खीर खाल्ली, त्यानं कितीही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच.', असं म्हणत त्यांनी नवाब मलिकांना टोला लगावलाय.

ईडी अधिकाऱ्यांचं एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झालं. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झालं, अशी माहिती आहे. दरम्यान, नवाब मलिक एनसीबीविरोधात आवाज उठवत होते. तेव्हाच त्यांनी ट्विट केलं होतं की, माझ्या घरी पाहुणे येणार आहेत आणि आज ते पाहुणे आले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीनं ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचं समजचंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT