donald_trump 
महाराष्ट्र बातम्या

#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प

सकाळ डिजिटल टीम

अवघ्या जगाचे लक्ष्य लागलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी दि. 9 नोव्हेंबर 2016 रोजी विजय मिळवला. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव केला. अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 प्रातिनिधीक मतांपैकी 270 मते आवश्‍यक असतात. ट्रम्प यांना 306 तर हिलरी क्‍लिंटन यांना 232 प्रातिनिधिक मते मिळाली. ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांचे सहकारी माईक पेन्स यांच्याकडे अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची धुरा असेल. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी :

  • 4 जून 1946 रोजी न्यूयॉर्कमधील फ्रेड ट्रॅम्प या बांधकाम व्यावसायिकांच्या कुटुंबात जन्मलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राथमिक शिक्षण लष्करी शाळेत झाले आणि पुढे पेनसिल्वानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी मिळवली. 
  • वडिलांच्या बांधकाम व्यवसायातच उडी घेतल्यानंतर हा व्यवसाय न्यूयॉर्क बाहेर विस्तारण्यास त्यांनी सुरुवात केली, याच दृष्टीने त्यांनी 1971 मध्ये वडिलांच्या कंपनीचे ट्रम्प ऑर्गनायझेशन असे नामकरण केले. बांधकाम व्यवसायात त्यांनी अल्पावधीतच जम बसवला आणि आजघडीला तर जगभरातील अनेक देशांमध्ये ट्रम्प यांच्या कंपनीचे ट्रम्प टॉवर बघावयास मिळतात. 
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या ट्रम्प यांना खरे तर कुठलीच राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. 1988 पासून ते कधी रिपब्लिकन तर कधी डेमोक्रॅटिक पक्षात असत, शिवाय 2000 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी रिपब्लिकन पक्षापासून काडीमोड घेत "रिफॉर्म' पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण शेवटी प्रायमरीपूर्वीच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. या पलीकडे त्यांच्याकडे कुठल्याच राजकीय कारकिर्दीचा वारसा नव्हता; परंतु असे असूनही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवली आणि सर्वच राजकीय तज्ज्ञांना आणि माध्यमांना चकवत निवडणूकही जिंकली. 
  • ट्रम्प यांचे बांधकाम व्यावसायिक म्हणून करिअर बरेच वादग्रस्त राहिलेले आहे. त्यांच्यावर अनेक वेळा करचुकवेगिरीचा आरोपही झालेला आहे. तसेच त्यांनी स्वतः व्यवसायात 4 वेळा दिवाळखोरी घोषित केलेली आहे. वाद आणि ट्रम्प यांचे नातेदेखील अतिशय घट्ट आहे. आपल्या विधानामुळे वाद अंगावर ओढून घेण्यासाठी ट्रम्प प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पुढची 4 वर्षे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्या कामगिरीकडे जगाचे लक्ष लागून राहणार आहे. 
  • ट्रम्प यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला "एनबीसी' या वाहिनीवरील "द ऍप्रेंटीस' या कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून काम बघितले आहे. शिवाय त्यांनी वेगवेगळी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1987 साली प्रकाशित झालेले "आर्ट ऑफ डिल' हे होय. त्यावेळी हे पुस्तक सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले होते. 

ट्रम्प यांनी लिहिलेली पुस्तके 

  • 1987 : 'ट्रम्प: द आर्ट ऑफ डिल' 
  • 1990 : सर्व्हायव्हिंग ऍट द टॉप 
  • 1997 : द आर्ट ऑफ कमबॅक 
  • 2000 : द अमेरिका वूई डिझर्व्ह 
  • 2008 : क्रिपल्ड अमेरिका: हाऊ टू मेक अमेरिका ग्रेट अगेन 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT