Students
Students Esakal
महाराष्ट्र

दहावीच्या मूल्यमापन अन्‌ अकरावी प्रवेशाच्या सीईटी सर्व्हेसाठी आज मध्यरात्रीपर्यंत मुदत !

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : दहावीच्या परीक्षा (Tenth Exam) रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांचे शाळांमार्फत अंतर्गत मूल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय जाहीर होऊन पंधरवडा उलटला. त्यानंतर शिक्षण विभागाने मूल्यमापनाचा सर्व्हे सुरू केला आहे. त्याची मुदत 9 मे रोजीच संपली आहे. मात्र, या कालावधीत राज्यातील 14 हजार 179 माध्यमिक शाळांनीच माहिती भरल्यामुळे त्याचीही मुदत 11 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी (Eleventh Admission) स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) असावी का, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन सर्व्हे (Online Survey) केला जात होता. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने या सर्व्हेची मुदत 11 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. (Extension for CET Survey of Tenth Internal Assessment and Eleventh Admission)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळा अंतर्गत मूल्यमापनास तयार आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन सर्व्हे सुरू केला आहे. शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन सर्व्हेसाठी दिलेली लिंक शाळांपर्यंत पोचेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत (ता. 9 मे) संपत आली होती. दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे का, हे जाणून घेण्यासाठी सात प्रश्नांच्याद्वारे हा सर्व्हे सुरू आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमांच्या इयत्ता दहावीचे वर्ग असणाऱ्या शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यास अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना या सर्व्हेचा शाळांकडे पाठपुरावा करण्यास शिक्षण विभागाने सुचविले आहे.

जिल्हानिहाय ऑनलाइन माहिती भरणाऱ्या माध्यमिक शाळांची संख्या

नगर 645, अकोला 239, अमरावती 243, औरंगाबाद 211, भंडारा 147, बीड 218, बुलडाणा 68, चंद्रपूर 324, धुळे 319, गडचिरोली 274, गोंदिया 168, हिंगोली 105, जळगाव 1017, जालना 23, कोल्हापूर 878, लातूर 106, मुंबई मनपा 525, मुंबई 980, नागपूर 28, नांदेड 306, नंदुरबार 150, नाशिक 950, उस्मानाबाद 277, पालघर 301, परभणी 176, पुणे 1093, रायगड 401, रत्नागिरी 537, सांगली 743, सातारा 999, सिंधुदुर्ग 246, सोलापूर 684, ठाणे 435, वर्धा 92, वाशीम 240, यवतमाळ 269

शाळांसाठी लिंक :

https://www.research.net/r/10INTASSESSMENT

अर्ज भरण्याची मुदत : 11 मे 2021 मध्यरात्रीपर्यंत

अकरावी प्रवेशाच्या मूल्यमापन सर्व्हेस मुदतवाढ

राज्य सरकारने राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) असावी का, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन सर्व्हे केला जात होता. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने या सर्व्हेची मुदत 11 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेबाबत पाच प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांचे मत विचारले जात आहे. या सर्व्हेची मुदत 9 मे पर्यंत होती. या कालावधीत राज्यातील दहावीच्या दोन लाख 14 हजार 166 विद्यार्थ्यांनीच सर्व्हेत आपले मत नोंदविले.

अकरावीच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सीईटी घेण्याचा शालेय शिक्षण विभाग विचार करत आहे. ही परीक्षा राज्यातील दहावीचे सर्व इच्छुक विद्यार्थी देऊ शकतात, असे शिक्षण विभागाचे मत आहे. या परीक्षेचे स्वरूप ओएमआर पद्धतीनुसार असावे. सर्वं विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा. पेपरसाठी दोन तास वेळ दिला जाईल. ही परीक्षा जुलैमध्ये अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात येईल, असे नियोजन शालेय शिक्षण विभाग करीत आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना गुणात्मक आधारावर अकरावीला प्रवेश मिळेल. अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची साधारणपणे 100 गुणांची ऑफलाइन प्रवेश चाचणी घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे.

विद्यार्थ्यांनी मत नोंदविण्यासाठी लिंक

https://www.research.net/r/11thCETTEST

नोंदविण्यासाठी मुदत : 11 मे 2021 मध्यरात्रीपर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT