उज्ज्वला गॅस योजन ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

गॅस सिलिंडर एक हजाराला! 'उज्वला'ची सबसिडी फक्‍त एक ते पाच रुपये

अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी 'उज्वला' योजना आली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात 46 लाख 83 हजार 261 लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. सुरवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली.

तात्या लांडगे

सोलापूर : रेशन धान्य दुकानातून 2014 पासून केरोसिन मिळणे बंद झाल्यानंतर देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी 'उज्वला' योजना आली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात 46 लाख 83 हजार 261 लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. सुरवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतरही सबसिडी वाढलेली नाही. त्यामुळे जवळपास सव्वासात लाख 'उज्वला' पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.

'चूल आणि मुल' एवढ्यापर्यंतच मर्यादित असलेली महिला आज शिक्षणाच्या जोरावर पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहे. हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात 12 गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला सबसिडी अधिक मिळत असल्याने कनेक्‍शनची संख्या भरमसाठ वाढली. मात्र, सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्यात आली. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे पुन्हा सरपणाची 'चुल'च बरी असा सूर त्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून निघू लागला. सध्या गॅस सिलिंडरचा दर 950 रुपये ते एक हजारापर्यंत झाला आहे. हातावरील पोट असलेल्यांना तेवढी रक्‍कम देऊन सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार
उज्वला असो वा अन्य नियमित ग्राहकांना दरमहा गॅस सिलिंडर दिला जातो. घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू नये म्हणून त्याच्या वापरावर कडक निकष लादण्यात आले. इंधन अथवा कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरल्यास पोलिसांत गुन्हा दाखल केला जातो. पण, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने बहुतेक ग्राहक दोन महिन्यातून एकदा किंवा वर्षातून आठ सिलिंडर घेतात. उर्वरित चार सिलिंडर चढ्या दराने इंधनासाठी तथा व्यवसायिकांना दिले जातात, हे पोलिस कारवाईतून उघड झाले आहे.

'उज्वला' योजनेची स्थिती
गॅस सिलिंडरची किंमत
950 ते 1000
एकूण लाभार्थी
46,83,261
उज्वलाची सबसिडी
1 ते 5 रुपये
अंदाजित कनेक्‍शन बंद
7.28 लाख

साडेतीनशे रुपयांचा गॅस सिलिंडर एक हजारांवर पोहचला आहे. एखाद्या वस्तूचे दर 30 रुपयांनी वाढवायचे आणि दोन रुपयांनी कमी करायचे ही भूमिका केंद्राची आहे. इंधन वाढल्याने खतांच्या किंमतीही वाढल्या, वाहतूक खर्च वाढला. उज्वला गॅस योजनेतून सिलिंडर घेणे सर्वसामान्यांना परवडेना. महागाई कमी होण्यासाठी जनतेने एकत्रित यायला हवे.
- छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT