Rain Updates in Maharashtra | Weather Forecast sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात २१ व २२ एप्रिलला वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात २१ व २२ एप्रिलला वादळी वाऱ्यासह पाऊस

सकाळ डिजिटल टीम

पुणे : दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह इतर राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने आज सोमवारी (ता.१८) पावसाचा अंदाज (Rain Forecast) वर्तवला आहे. येत्या २१ आणि २२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.(Heavy Rain Hit Some Parts Of Maharashtra, Met Forecast)

या अवेळी पावसाचा फटका पिकांना बसू शकतो. तसेच देशातील आसाम व मेघालय राज्यात पावसासह गारपीठ होईल, असे हवामान विभागाने कळविले आहे. महाराष्ट्रात भारनियमन सुरु आहे. त्यात तीव्र उन्हामुळे राज्यातील नागरिक त्रस्त आहेत. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

उन्हाळा सुरु झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अनेकदा अवकाळी पाऊस पडला आहे. त्याचा फटका आंब्यासह इतर पिकांना बसलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT