Maratha Andolan Bachchu Kadu and Manoj Jarange  
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: "आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल"; बच्चू कडूंच्या विधानामुळं संभ्रम

सगे-सोयरे सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये सगे-सोयरे सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. पण याला आता आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे. आत्तापर्यंत जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या कडू यांच्या या विधानावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. (If child is taken caste by mother then it will be big mess says Bacchu Kadu on Maratha Reservation)

आपली पुरुषप्रधान संस्कृती

बच्चू कडू म्हणाले, "सगे सोयरे आरक्षणात घेता येईल असं म्हटलं होतं, पण ते थोडं अडचणीचं होईल. रवी राणा ओबीसी आहेत तर त्यांच्या पत्नी नवनीत राणा या एससीमध्ये येतात. यामध्ये नवनीत राणा यांची जात आपण बदलू शकत नाही. त्यामुळं हा विषय आता तिकडे जातो आहे. पण यामध्ये अडचण अशी आहे की, आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळं आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल" (Marathi Tajya Batmya)

आम्हाला ही अपेक्षा नव्हती

दरम्यान, बच्चू कडू यांच्या या विधानावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. सरकारच्या प्रतिधींनी मला लिखित दिलं त्यावेळी बच्चू कडू यांनी त्यात सगे-सोयरे हा शब्द लिहिला होता त्यामुळं आता जर ते असं बोलत असतील तर त्यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ज्या मराठ्यांचे कुणबी दाखले सापडले आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. पण ही प्रमाणपत्र ज्यांना मिळतील त्यांच्या सग्या सोयऱ्यांना अर्थात आईकडच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. कारण हा सगे-सोयरे शब्द खुद्द कुणबी दाखले शोधण्याची जबाबदारी असल्याचं शिंदे समितीनं लिहून दिलं होतं. त्यावरच जरांगे यांनी आंतरवलीत उपोषण सोडलं होतं, असा दावा जरांगेंनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT