पुणे - वाहनात वापरण्यात येणारे तांत्रिक भाग, तंत्रज्ञान विकसित करीत भारत आपली क्षमता वाढवीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. इतकेच नाही तर इंडस्ट्री ४.० च्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना आता आपण एक जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास येत असल्याचे प्रतिपादन महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या ऑटोमोटिव्ह डिव्हीजनचे सीजीपीडी आर वेलूसामी यांनी केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआय, एएसएम (ASM) पुणे चॅप्टर आणि एसएई इंडिया (SAE INDIA) यांच्या वतीने मटेरिअल्स ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन प्रसंगी वेलूसामी बोलत होते.
एएसएम (ASM) पुणे चॅप्टरच्या प्रमुख डायना इसॉक, एसएई इंडियाचे अध्यक्ष डॉ. बाला भारद्वाज, पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी)चे संचालक प्रा. बी. बी. अहुजा, एआरएआयचे संचालक रेजी मथाई, परिषदेचे संयोजक (कन्व्हेनर) संजय निबंधे, वरिष्ठ उपसंचालक नीलकंठ मराठे, उपसंचालक विजय पंखावाला आदी या वेळी उपस्थित होते. पहिल्यांदाच ही परिषद ऑनलाईन पद्धतीने भरविण्यात आली होती. ज्यामध्ये देशभरातून संशोधक व या क्षेत्राशी संबंधितांनी आपला सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना आर वेलूसामी म्हणाले, 'आज कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेत असताना ग्राहकांच्या गरजांबरोबरच सरकार आणि संस्था यांना लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. नजीकच्या भविष्यात नव्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मटेरिअल्सचा विचार करणे याला देखील आता महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र हे करीत असताना ती मटेरिअल्स ही कमी वजनाची आणि टिकाऊ (सस्टेनेबल) असावी यावर भर दिला गेला पाहिजे.”
मटेरिअल सस्टेनिबिलिटी विषयी बोलताना डॉ. बाला भारद्वाज म्हणाले, “ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मटेरिअल्सचे उत्पादन करीत असताना ते दीर्घ कालावधीसाठी टिकून राहतील याची आधी खात्री करुन घेणे महत्त्वाचे असणार आहे. याशिवाय पर्यावरण, पाणी आणि वीज आणि यामुळे होणारे औद्योगिक प्रदूषण यावर या मटेरिअल्सचा काय परिणाम होतो हे देखील आधीच तपासणे गरजेचे आहे. कोणतेही मटेरिअल निवडताना त्याला लागणारा कच्चा माल हा पुढील किमान १० टे ५० वर्षे उपलब्ध होऊ शकेल याची खात्री करून घ्यावी लागेल. त्याखेरीज यामध्ये आपण आत्मनिर्भर होऊ शकणार नाही.”
नजीकच्या भविष्यात वापरात येणारी ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मटेरिअल ही वजनाने हलकी, टिकाऊ, पर्यावरण पूरक आणि परवडणा-या दरातील असावी, असे मत डॉ, बी. बी. अहुजा यांनी व्यक्त केले.
‘भविष्यातील गतीशीलतेसाठी ऑटोमोटिव्ह मटेरियल आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील प्रगती’ या संकल्पनेवर यावर्षीची ही तिस-या परिषदेचे आयोजित करण्यात आले असून पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला समोर ठेवत अत्याधुनिक तंत्रज्ञान, भविष्यातील ऑटोमोटिव्ह मटेरियल यांमधील भविष्यातील कल्पना, तंत्रज्ञान, पर्याय, आवश्यकता यावर यादरम्यान चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती एआरएआयचे संचालक रेजी मथाई यांनी यावेळी दिली.
मोबिलिटी संदर्भातील आव्हाने आणि ऑटोमोटिव्ह मटेरियल्सचे महत्त्वपूर्ण योगदान याविषयी डायना इसॉक यांनी माहिती दिली.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.