Maharashtra Scholarship Exams 2022 Date sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं! पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी स्कॉलरशीपची परीक्षा वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होते मात्र कोरोना संकटाच्या सावटामुळे राज्यात होणार्‍या शिष्यवृत्तीच्या परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. मात्र आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा स्कॉलरशीपची परीक्षा 20 जुलै 2022 दिवशी होणार आहे. स्कॉलरशीप परीक्षेसाठी 30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करता यईल तर शुल्क भरण्याची अंतिम मुदत 2 मे असणार आहे.

टीईटी गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या पोलिस तपासामुळे आणि कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर पडली होती. मात्र आज अखेर यंदाच्या स्कॉलरशीप परीक्षेच्या तारखेची घोषणा केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. सोबतच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देखील जाहीर झाली आहे.

यंदा होणाऱ्या परीक्षेची जबाबदारी विनर कंपनीकडे दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा तसेच नुकताच उघडकीस आलेला टीईटी घोटाळा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

स्कॉलरशीपची परीक्षा भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या प्रमुख 3 विषयाची असते. यामध्ये राज्यभरातून अव्वल येणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्नावली असते. सार्‍या विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT