political News  
महाराष्ट्र बातम्या

शिंदेंच्या सुरक्षेवरुन रणकंदन; कांदेंच्या आरोपावर 2 माजी गृहराज्यमंत्र्यांच्या वेगळ्या भूमिका

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होती.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होती.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आमदार सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशांमुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरक्षा नाकारण्यात आली असल्याचा गंभीर आरोप कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होती. यावेळी नक्षलवाद्यांकडून शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी याची माहिती दिली होती. त्यावेळी गृहविभागाने शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता.

उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन गृहमंत्री शंभुराज देसाई यांना फोन करुन झेड प्लस सुरक्षा देण्यास मनाई केली, असा दावाही सुहास कांदे यांनी केला आहे. आता यावर राज्यातील दोन गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सुहास कांदेंच्या आरोपाला शंभुराज देसाईंचा दुजोरा दिला आहे.

काय म्हणाले शंभुराज देसाई?

सुहास कांदे यांनी केलला आरोप योग्य असून मला उद्धव ठाकरेंचा अशा पद्धतीचा फोन आला होता, असं त्यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांना माओवाद्यांचं धमकीचं पत्र आलं होतं. यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची गरज होती. सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरेंचा याला विरोध होता, असा दावाही त्यांनी केला होता.

यासंदर्भात, कॉंग्रसे नेते सतेज पाटील म्हणाले, सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. अहवाल पाहिला जातो आणि मग त्याबाबतचा निर्णय घेतला जातो, असं सतेज पाटील यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT