nana patole nana patole
महाराष्ट्र बातम्या

मी गाव गुंडाबद्दल बोलत होतो, त्याचं नाव मोदी आहे; पटोलेंचे स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : रविवारी सायंकाळी घेतलेल्या प्रचार सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला (Narendra Modi) मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना म्हणाले (Nana Patole), ‘मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याच नाव मोदी आहे. तुम्हाल कोणता मोदी म्हणायचा आहे’ असा प्रश्न केला.

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) निवडणुका (elections) होऊ घातल्या आहे. रविवारी प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मतदार संघात नागरिकांशी संवाद साधला.

रविवारी सायंकाळी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे प्रचार सभेत काही नागरिकांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नाना पटोले (Nana Patole) ‘आपण मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे एकाला सांगत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडिओ चांगला व्हायरल झाल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली. ‘मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते. त्याच नाव मोदी आहे. तुम्हाल कोणता मोदी म्हणायचा आहे’ असा प्रश्न नाना पटोले यांनी केला. माझ्याजवळ लोक गाव गुंडाबद्दल तक्रार करायला आले होते. त्याच्याबद्दल मी बोलत होते. तुम्हाल कोणता मोदी म्हणायचा आहे, असा प्रश्न नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT