Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj : राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात येणार छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा; 'या' दिवशी PM मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

येत्या काळात राजकोट परिसर पर्यटनाचा नवा हब बनणार आहे.

प्रशांत हिंदळेकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा राजकोट समुद्रकिनारी बसविण्यात येणार आहे.

मालवण : शहरातील मेढा-राजकोट समुद्रकिनारी ४ डिसेंबरला होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने (Navy Day) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील पर्यटनात आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे.

येत्या काळात राजकोट परिसर पर्यटनाचा नवा हब बनणार आहे. यामुळे अनेकांना रोजगाराची चांगली संधीही निर्माण होणार आहे. पर्यटनाची राजधानी म्हणून मालवणकडे पाहिले जाते. काही वर्षांपूर्वी येथे येणारा पर्यटक हा ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग, तारकर्ली, देवबाग येथेच भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटत होते. त्यामुळे पर्यटन वाढविण्यासाठी नवनवीन आकर्षण निर्माण करणे गरजेचे बनले.

यात सुरुवातीस भर पडली ती स्कुबा, स्नॉर्कलिंग, साहसी जलक्रीडा प्रकारांची. शहरातील बंदर जेटी, दांडी, चिवला बीचसह वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग येथे स्कुबा, स्नॉर्कलिंग, साहसी जलक्रीडा प्रकार सुरू झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराची चांगली संधीही प्राप्त झाली. शहरात येणारा पर्यटक हा किल्ले सिंधुदुर्ग, साहसी जलक्रीडा प्रकाराचा आनंद लुटल्यावर माघारी परतत असल्याने पर्यटकांचे वास्तव्य कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे बनले.

यात शहरातील मेढा राजकोट परिसरातील रॉक गार्डनमध्ये म्युझिकल फाउंटन, सेल्फी पॉईंट यासह अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्याचबरोबर चिवला बीच कम बंधाऱ्यावर आकर्षक विद्युतरोषणाई अशी नवनवीन आकर्षणे निर्माण करण्यात आली. येत्या ४ डिसेंबरला येथे नौसेना दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथील समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे.

राजकोट परिसरात ऐतिहासिक कुशेवाडा, मौनीनाथ मंदिर, सुवर्ण गणेश मंदिर, रॉकगार्डन, त्याला लागूनच चिवला बीच परिसर असल्याने येत्या काळात राजकोट परिसर पर्यटनाचा नवा हब बनणार आहे. शिवपुतळ्याचे उद्‌घाटन ४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही पुतळा नव्हता.

असा असणार पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा राजकोट समुद्रकिनारी बसविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दर्शनी भाग हा किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने असणार आहे. छत्रपतींच्या हातात तलवार असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याच्या परिसरात किल्ले सिंधुदुर्गप्रमाणे तटबंदी उभारण्यात येणार आहेत. संपूर्ण परिसर शिवकालीन वातावरण निर्माण करणारा बनविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT