nitesh rane esakal
महाराष्ट्र बातम्या

हालचाली वाढल्या; नितेश राणेंचे पीए राकेश परब पोलिसांना शरण

जिल्हा न्यायालयात दाखल होत शरणागती पत्करली असून जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता.

विनोद दळवी

कणकवली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आमदार नितेश राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब आज सकाळी पोलिसांना शरण आले आहेत. जिल्हा न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गेले चार-पाच दिवस ते दडुन होते. आज सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावली. पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. (nitesh rane PA rakesh parab present in sindhudurg court for infromation give)

शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा (Sindhudurg District) न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होणार की नाही ? याबाबत आजच अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

आज सायंकाळपर्यंत त्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी आज नितेश राणे यांच्या जिल्हा न्यायालयातील अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, त्यांनाही अटक होण्याची शक्‍यता असल्याने आज कणकवलीत प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकीकडे जिल्हा एकता व्यापारी मेळावा तर दुसरीकडे राजकीय वातावरण तप्त झाले आहे. त्यामुळे पोलिसांनीही सतर्क भूमिका घेत आज सकाळपासून प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे श्रीधर चौकात पोलिसांच्या चार ते पाच व्हॅन उभ्या आहेत तसेच वरिष्ठ अधिकारीही गस्त घालत आहेत.

न्यायालयाचा निकाल कोणत्या क्षणी आल्यानंतर आमदार नितेश राणे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान त्यांचे खाजगी सचिव राकेश परब यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी आज सकाळी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे एकूणच वातावरण तंग बनले आहे. राणें यांचे पीए राकेश परब यांच्या मोबाईलवरून सचिन सातपुते यांना गुन्हाच्या पुर्वी काही दिवस अनेकदा संपर्क झाला आहे. पुण्यातील त्या टोळीच्या थेट संपर्कात स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते तथा नितेश राणे यांचे निकटवर्तीय सचिन सातपुते यांच्याशी राकेश परब यांचा झालेला संपर्क याचा काही संबंध या गुन्हाशी जोडण्यात आला आहे.

काय आहे नेमंक प्रकरण

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आ राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च (Mumbai High court) न्यायालयात अपील करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अर्ज फेटाळताच सर्वोच्य न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. गुरुवारी याच्यावर सुनावणी होत न्यायालयाने अर्ज फेटाळला. तसेच दहा दिवसांत शरणागती पत्करा व जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करा, असे आदेश दिले होते. यानुसार त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल होत शरणागती पत्करली असून जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT