nitesh rane esakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणे तुरुंगात पुस्तक वाचून वेळ घालवतायत? फोटो होतोय व्हायरलं

नितेश राणे यांचा हा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत

स्नेहल कदम

नितेश राणे यांचा हा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत

सध्या भाजपाचे (BJP MLA) आमदार नितेश राणे यांची न्यायायलयीन चौकशीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. मागील काही दिवसांपासून नितेश राणे न्यायालयांच्या फेऱ्यांत अडकले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेदरम्यान शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असून याप्रकरणी राणे बुधवारी न्यायालयासमोर शरण आले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने (Sidhudurg District court) नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या सर्व घटना घडत असताना आता नितेश राणे (Nitesh Rane) यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

हा फोटो आहे नितेश राणे यांचा तुरुंगात बसून पुस्तक वाचण्यात दंग असल्याचा. या फोटोमध्ये तुरुंगातील कोठडीचे लोखंडी गज आणि त्यापलीकडे पुस्तक वाचत बसलेले नितेश राणे (Nitesh Rane) स्पष्टपणे दिसत आहेत. महिन्याभराच्या अज्ञातवासानंतर काल पोलिस कोठडी (Police Custody) सुनावलेलं नितेश राणे हे निवांतपणे पुस्तक वाचत असल्याचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या, पण काही तासातच या फोटो खरा की खोटा यामागील खुलासा झाला आहे. (Nitesh Rane Viral Photos from Jail)

नितेश राणे यांचा व्हायरल झालेला फोटो बुधवारचा नसून पाच वर्षापूर्वीचा आहे. वाळूच्या प्रश्नावरुन पाच वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करुन राडा केला होता. त्यावेळी नितश राणे यांना अटक झाली होती. तेव्हाचे नितेश राणेंचे हे छायाचित्र आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे हे सध्या दोन दिवस पोलिस कोठडीत आहेत. नितेश राणे यांनी बुधवारी संध्याकाळी कणकवली (Kankvali) दिवाणी न्यायालयासमोर शरणागती पत्कारली होती.

यानंतर न्यायालयात राणेंच्या पोलिस कोठडीसाठी युक्तिवाद झाला. न्यायालयाने नितेश राणे यांना केवळ दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, 'न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत आहे,' असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT