political esakal
महाराष्ट्र बातम्या

राणेंच्या गौप्यस्फोटाला कनाल यांचं आव्हान; दिशा सलियन प्रकरण नव्या वळणावर

माझा वर्षाचा सीडीआर तपासावा, काही आढळले नसल्यास तुम्ही राजीनामा देणार का?, कनाला यांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

माझा वर्षाचा सीडीआर तपासावा, काही आढळले नसल्यास तुम्ही राजीनामा देणार का?, कनाला यांचा सवाल

शिवसेना नेते राहुल कनाल यांच्यावरील आयकर (IT) विभागाच्या धाडीमुळे सेनेतील जुन्या फळीतील नेते आनंदित असून त्यांचे मला फोन येवून गेले आहेत, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. याशिवाय नितेश राणे यांनी राहुल कनाल यांचा दिशा सॅलियन (Disha Salian) आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी संबंध जोडला असल्याने कनाल यांनी ट्विट करत नितेश राणेंना (Nitesh Rane) प्रतत्युर दिले आहे.

राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी यासंदर्भात ट्विट केलं असुन यात ते म्हणतात, सर्वोच्च यंत्रणेनेनं माझा सीडीआर तपासावा. पण केवळ ८ आणि १३ जुनचा नाही तर संपूर्ण वर्षांचा तपासावा. त्यात जर काही आढळले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? कायम लक्षात ठेवा, देव सर्वोच्च आहे आणि कायम सत्यासोबत असतो. लोकांना फोन करतं रहा आणि आनंद घेत रहा, असा उपरोधिक टोला त्यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला आहे.

काय आहे नितेश राणेंच ट्विट

कनाल यांच्या ८ आणि १३ जून २०२० रोजीच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि सीडीआर तपासल्यास दिशा सॅलियन (Disha Salian) आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होवू शकते. गुन्ह्यातील जोडीदार असाही आरोप राणे यांनी केला आहे. राणे यांनी कनाल यांच्यावर मुंबईच्या नाईट लाईफ गॅंगचा सदस्य असल्याचा आरोप केला आहे. तसेच शिर्डीच्या संस्थांनावर नेमणूक करण्याइतकी त्याच्यावर कोणाची एवढी कृपादृष्टी आहे? त्याच्याकडे एवढा पैसा आला कोठून? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय (Budget Session 2022) अधिवेशन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Govt.) नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागल्याने सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप्रत्यारोप पहायला मिळत आहे. राज्यातील शिवसेना (Shivsena) नेते सध्या आयकर विभागाच्या रडावर असून यशवंत जाधव यांच्यानंतर आता राहुल कनाल यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कारवाईनंतर शिवसेना कोणती प्रतिक्रिया देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT