Rajmata Jijau Jayanti esakal
महाराष्ट्र बातम्या

Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाऊंच्या बालपणाची साक्ष असलेला भुईकोटचा वाडा

महाराष्ट्रातली प्रत्येक आई ज्यांच्या प्रेरणेने आपल्या मुलांवर संस्कार करते अशा राजमाता जिजाबाईसाहेब

सकाळ डिजिटल टीम

Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाबाईसाहेबांबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही; महाराष्ट्रातली प्रत्येक आई ज्यांच्या प्रेरणेने आपल्या मुलांवर संस्कार करते अशा जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला.

लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. लखुजीराजांना चार मुलं होते पण लखुजीराजे आणि म्हाळसा बाईंना मुलीची आस होती त्यांनी रेणुका मातेला मुलगी व्हावी म्हणून नवस केलेला आणि अर्थात तो फळास आला.

जिजाऊंचा जन्म ज्या काळात झाला, तो काळ पारतंत्र्याचा होता. अशा वातावरणात स्त्रियांनाच काय, पुरुषांनाही शिक्षण दिले जात नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या वातावरणात जिजाऊंना युद्धकलेचे, साक्षरतेचे धडे लखुजीराजे यांनी दिले होते. जिजाऊसाहेब घोड्यावर बसण्यात तर अगदी पटाईत होत्या. त्यांनी मुघल सैन्य पाठीवर असताना घोड्यावर बसून शत्रूला चकवा दिल्याचे अनेक दाखले इतिहासात प्रसिद्ध आहेत. जिजाऊसाहेब तलवार चालविणे, भालाफेक, धनुष्यबाण चालविणे इत्यादी प्रशिक्षणात तरबेज होत्या. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.

भुईकोट राजवाडा

आज सिंधखेडच हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते. जिजाऊंचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये झालेला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वास्तूसमोर नगर पालिकेने एक बगिचा देखील तयार केला आहे. इथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वास्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊ खेळल्या तो रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी केली होती.

इतर बघण्याची स्थळे

1. नीलकंठेश्वराचं प्राचीन मंदिर

इथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.

2. रंग महाल

रंग महालाचे बांधकाम पूर्णता विटाची असून चौथरा मात्र दगडी आहे. राजवाड्याच्या रानी महालाची छोटी प्रतिकृती म्हणजे रंग महाल होय. पारंपरिक दंतकथेनुसार एका रंगपंचमीला जिजाऊ व शहाजी यांनी बालपणी एकमेकांवर रंग उडवला व लखुजी राजांनी जोडा छान शोभतो असे उद्गार काढले तो हा रंगमहाल होय. रंग महाल म्हणजे जाधवरावांची न्याय कचेरी असल्याचे सांगितले जाते.

3. दगडी नारळाचे तोरण

दगडात कोरलेले चौदा नारळ म्हणजे कारागिरीची दुर्मीळ नमुना म्हणावा लागेल. आता फक्त दोनच नारळाच्या शिल्पाकृती मूळ स्वरूपात कायम असून अन्य नारळ महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने १९७४ साठी लावलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या इमारतीची एकूण उंची ११.६५ मीटर आहे. राजवाड्याच्या पश्चिमेस लागूनच कृत्य महाल किंवा कंपनीचा महाल या नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे.

4. काळकोठ किल्ला

राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात त्यांनी भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात केली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळकोठचा किल्ला. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत.

5. साकरवाडा

साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट इथे आहे, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

6. मोतीतलाव

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून आजूबाजूला सुंदर परिसर आहे.

7. चांदणी तलाव

मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती.

कसे पोहोचाल?

विमानाने :- औरंगाबाद येथील विमानतळ ९२ किमी अंतरावर आहे.

रेल्वेने :- जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानक अनुक्रमे ३३ व ९६ कि.मी अंतरावर आहे

रस्त्याने :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकामधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध असतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT