Rupali Patil Thombare esakal
महाराष्ट्र बातम्या

गोपीनाथराव मुंडेंना विसरलेला भाजपा,रुपाली पाटील ठोंबरेंची टीका

'शरद पवार साहेबांच्या मुळे शिवसेनेने भाजपला योग्य वेळी जागा दाखवली.'

गणेश पिटेकर

पुणे : स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना विसरलेला भाजपा, त्यांनी महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार?, असा प्रश्न करित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, की शरद पवार साहेबांच्या (Sharad Pawar) मुळे शिवसेनेने (Shiv Sena) यांना योग्य वेळी जागा दाखवली. सावधना ! कमळाच्या चिन्हावर लढणारी राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हे शेवटचा घटका मोजत आहेत, अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. (Rupali Patil Thombare Said, BJP Forget Gopinath Munde)

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र भाजपकडून नेहमी शिवसेनेवर महायुती तोडल्याचा आरोप केला जात आहे. गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले होते. ते म्हणाले शिवसेनेने सत्तेच्या बाहेर पडून निवडणूक लढवावी. काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT