Sambhaji Raje News सकाळ
महाराष्ट्र बातम्या

मला स्वराज्य घडवायचा... महाराजांची फोटो शेअर करत संभाजीराजेंची भावनिक पोस्ट

शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारल्यांनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्ह्णून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारल्यांनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्ह्णून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजप आणि महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतलाय, ज्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे समर्थक जास्तच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.(Sambhaji Raje Chhatrapati Twitter Post on Rajya Sabha Election)

नुकताच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा एक फोटो पोस्ट केला आणि जनतेला पाठिंबा देण्याचे आव्हान केले आहे. संभाजीराजे राजे यांनी लिहिलं कि, 'महाराज... तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय. मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी, मी बांधील असेन तो फक्त जनतेशी...'

दरम्यान, जरी भाजप आणि महाविकास आघाडीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचं नाकारलं असलं तरी,मराठा संघटनांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळतोय. शिवसेनेनं संभाजीराजेंशी गद्दारी केल्याचा आरोप यावेळी संघटनांनी केलाय. यासंदर्भात काल २५ मे रोजी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा व्हायरल केली होती. ज्यात म्हंटल होत कि, 'आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार'. ही पोस्ट म्हणजे शिवसेनेला इशारा असल्याचं म्हंटल जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT