Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

आसामहून 'बॉड्या' आणणार म्हणणाऱ्या राऊतांनी फिरवले शब्द; ट्वीट चर्चेत

कामाख्या देवीला रेड्यांचा बळी लागतो, चाळीस रेडे आम्ही तिकडे पाठवलेत, असंही संजय राऊत म्हणाले होते.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी बंड केलं आणि गुवाहाटीत आपला मुक्काम हलवला. त्यानंतर शिवसेना (Shivsena) चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने या बंडखोरांवर वादग्रस्त शब्दांत टीका करत आहेत. अशातच आता त्यांचं नवं ट्वीट चर्चेत आलेलं आहे. (Sanjay Raut News)

जहालत एक किस्म की मौत है और जाहिल लोग चलती फिरती लाशें है, असं संजय राऊत आपल्या या ट्वीटमध्ये म्हणतायत. या ट्वीटचा संदर्भ कळण्यासाठी याची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी. काही दिवसांपूर्वी बंडखोरांबद्दल संजय राऊतांनी (Sanjay Raut) वादग्रस्त विधान केलं होतं. आसाममधून आपण ४० 'बॉड्या' (मृतदेह) परत आणणार, असं विधान त्यांनी केलं होतं. तसंच आसाममधल्या कामाख्या देवीला रेड्याचा बळी द्यावा लागतो. आम्ही तिकडे ४० रेडे पाठवलेत, असंही ते म्हणाले होते.

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वादग्रस्त विधानांचं सत्र सुरूच आहे. आता शिवसेनेतल्या बंडखोरांवर तीव्र टीका केली जात आहे. काल सामनामधूनही बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख एकदास शिंदे, तर बंडखोर आमदारांचा उल्लेख नाच्या असा करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मुरली + भज्जी + वॉर्न + कुंबळे! पठ्ठ्याची गोलंदाजी पाहून क्रिकेटविश्व स्तब्ध; इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिली ऑफर

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय पक्षाकडून तयारीला सुरुवात

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

SCROLL FOR NEXT