Niranjan Takle
Niranjan Takle  esakal
महाराष्ट्र

'पटेलांनी गांधीजींकडे नेहरूंना पंतप्रधान करावे अशी इच्छा व्यक्त केली होती'

सुनील इंगळे

औरंगाबाद : महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे अर्धसत्य व चुकीचा इतिहास सांगत समाजात गांधीद्वेष पेरला जात आहे. या अर्धसत्यामुळे देश अराजकतेकडे जात आहे. या अर्धसत्याला उत्तर देत गांधींचा पूर्ण आणि खरा इतिहास पुढे आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने गांधी भवनात रविवारी (ता.२०) आयोजित व्याख्यानात टकले यांनी ‘गांधी : काल आज उद्या’ या विषयावर विचार मांडले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. झाकीर पठाण आणि प्रा. मच्छिंद्र गोर्डे उपस्थित होते. १९१५ ला गांधीजी परदेशातून आल्यानंतर त्यांनी जवळपास देशातील बावीसशे ठिकाणांना भेट दिली व भारताविषयी जाणून घेतले. या घटनेला शंभर वर्षे झाली. (Sardar Patel Wrote Letter To Mahatma Gandhi And Said Make Nehru As Prime Minister, Says Niranjan Takle)

त्या वर्षी २०१५ मध्ये मी त्याच मार्गावर प्रवास करून गांधीजी समजून घेतले. गांधी (Mahatma Gandhi) ज्यांना भेटले त्या व्यक्तींच्या वंशजांना भेटून जुन्या आठवणी जाणून घेतल्या. त्याबद्दल टकले यांनी आपले प्रवासवर्णन सांगितले. आजही गांधी जिवंत आहेत, कारण की गांधीजींना जाऊन ७४ वर्ष झाली असली तरी सत्तेत असलेल्या नेत्यांनी किंवा नागरिकांनी आपल्या मुलाचे नाव नथुराम ठेवले नाही, एवढी शरम, हया आजही कायम आहे, असे त्या प्रवासादरम्यान एका तरुणांनी त्यांच्या समोर मत व्यक्त केल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. तर गांधी आणि माझे विचार एकसारखे आहेत असे खुद्द पुणे करारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Babasaheb Ambedkar) पहिली प्रतिक्रिया दिली होती.

तसेच संघाच्या (RSS) वतीने सरदार पटेल (Sardar Patel) यांना गांधीजींनी पंतप्रधान होऊ दिले नाही असे सांगण्यात येते. परंतु खुद्द पटेलांनी गांधीजींना केलेल्या पत्र व्यवहारात नेहरूंना पंतप्रधान करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग आणि गांधी यांच्या संबंधी चुकीची माहिती पसरवून गांधीद्वेष वाढवला जात आहे. दरम्यान गांधीजी आणि गांधी विचार यांच्या विरोधात व्हॉटसअॅप विद्यापीठातून मोहीम राबविली जाते. कोणतेही वाचन नसलेले आणि विचार नसलेले लोक मालवाहतूक केल्याप्रमाणे मेसेजेस फॉरवर्ड करीत राहतात असे सांगत यावेळी टकले यांनी मोदी, शहा आणि संघावर सडकून टीका केली. मोदी आणि शहा ही देशातील बुलडोझर आहेत. त्यांनी आतापर्यंत देशात काही उभारलेले नाही, परंतु भारताला उद्ध्वस्त करायचे काम ते करत आहेत. तर पुण्यतिथी दिनी संघ गांधींना वंदन करते परंतु इतर दिवस ते वंदन का करत नाही. कारण संघाला गांधींच्या मृत्यूवर जास्त प्रेम असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT