Swayam Patil निकिता जंगले
महाराष्ट्र बातम्या

जिद्द असेल तर काहीही साध्य! नाशिकच्या स्वयमला राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार

मनात जिद्द असली की सर्व काही साध्य होते.

सकाळ डिजिटल टीम

कुठलाही आजार जिद्द, चिकाटीसमोर गुडघे टेकतो. मनात जर इच्छाशक्ती असली कि सर्व समस्या शुन्य वाटतात . या गोष्टीचा प्रत्यय नाशिकच्या क्रीडापटू स्वयम पाटील याने दिलाय. स्वयमला एक आजार आहे आणि तरीही त्यानं स्विमिंगमध्ये नाव कमावलंय, त्याच्या याच जिद्दीची आणि कामगिरीची दखल घेत स्वयमला नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मनात जिद्द असली की सर्व काही साध्य होते. माणुस अशक्य गोष्टी पण सहज शक्य करतो आणि मोठी उंची गाठतो. या गोष्टीचा प्रत्यय नाशिकच्या क्रीडापटू स्वयम पाटील याने दिलाय. शारीरीक आणि मानसिक आजाराने ग्रस्त असलेला स्वयम विलास पाटील हा एक उत्तम जलतरणपटू आहे. स्वयमला नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्याला ऑनलाईन पध्दतीने देण्यात आला.

अभिनव तंत्रज्ञान, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 साठी बालशक्ती पुरस्काराच्या माध्यमातून देशभरातील 29 मुलांची निवड करण्यात आली होती. त्यात स्वयमचाही समावेश होता. ऑनलाईन पध्दतीने स्वयमला एक लाख रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे सोमवारला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वयम हा नाशिकच्या राजीव नगर परीसरात राहतो. तो आठवीत शिकत असून एक उत्तम जलतरणपटू आहे. स्वयम ला एक आजार असून त्यामुळे त्याला शारिरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. तरीसुध्दा तो जलतरणात अव्वल आहे.

दोन वर्षापुर्वी जलतरणात स्वयमने मुंबई येथील १४ किलोमीटर खाडी ४ तास ९ मिनीटात पोहून त्याच्या नावी विक्रम केला होता. जलतरणात स्वयमने दिव्यांगजन सशक्तिकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार २०१८, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २०१७, वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड २०१८, जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२० तसेच वर्ल्डस् रेकॉर्ड इंडिया अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे आणि आता स्वयमला राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कराने गौरविण्यात आल्याने नाशिकसह पाटील कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे म्हणत स्वयमचे कौतुक केले आहे

कुठलाही आजार जिद्द, चिकाटीसमोर गुडघे टेकतो. मनात जर इच्छाशक्ती असली कि सर्व समस्या शुन्य वाटतात आणि हे स्वयम पाटीलने सिध्द केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT