Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

दोन दिवसांत 'तो' शब्द फिरला अन् मविआ सरकार स्थापन झालं; देसाईंनी सांगितली हकीकत

'त्या वेळी आम्हाला वाटलं भाजप-शिवसेना युती होणार आहे; पण..'

सकाळ डिजिटल टीम

'त्या वेळी आम्हाला वाटलं भाजप-शिवसेना युती होणार आहे; पण..'

सातारा : गेल्या अडीच वर्षांत एकही निर्णय शिवसैनिकांच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेसबरोबर (Congress) युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना (Shiv Sena) खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

येथे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रणीत शिवसेना गटाच्‍या मेळाव्‍यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. देसाई म्हणाले, ‘‘सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार स्थापनेवेळी दिला होता. त्या वेळी आम्हाला वाटले भाजप-शिवसेना युती होणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसांत तो शब्द फिरला आणि राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर युती करून सरकार स्थापण्‍याची घोषणा त्‍यांनी केली. त्‍याला एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी विरोध केला होता. शिवभोजन केंद्र सुरू करण्याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. अडीच वर्षांत एकही शिवसैनिकाला शिवभोजन केंद्र मिळाले नाही.’’

राष्ट्रवादी नेत्यांनी यादी दिली, की मंजूर असा सर्व कारभार अडीच वर्षे सुरू होता. या अडीच वर्षांत कोणताही निर्णय शिवसैनिकाला न्यायासाठी झाला नाही. आज मातोश्रीवर सर्व जण खुलेपणाने जात आहेत; पण गेल्‍या अडीच वर्षांतील चित्र वेगळे होते. मुख्यमंत्री दालनात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. मात्र, उपमुख्यमंत्री दालनात कोविड नव्हता असे चित्र अनेक वेळा दिसल्‍याची टीकाही देसाईंनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT