amar kale esakal
महाराष्ट्र बातम्या

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

MP Amar Kale claims: जाणून घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूरचे शहाराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा उल्लेख करत खासदार अमर काळे यांनी नेमकं काय सांगितलंय?

Mayur Ratnaparkhe

Amar Kale’s Explosive Allegation in Election Context: देशाच्या राजकीय वातावरण सध्या लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांमुळे तापलेलं आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही प्रत्त्युत्तर दिलं आहे. तर या मुद्य्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप—प्रत्यारोप सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या एका विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. ‘’विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती.’’ असं शरद पवारांनी म्हटलं आहे. यानंतर आता खासदार अमर काळे यांनीही अशाप्रकारे विधान केल्याने, चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूरचे शहाराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनाही दोन कोटी रुपये देवून निवडणूक जिंकण्याची ऑफर देणात आली होती, असा दावा खासदार अमर काळे यांन केला आहे. मात्र संपर्क करणारे कोण होते हे पेठे यांनी सांगितलं नाही. निवडणूक काळात अशी अनेक लोक आमच्याकडे आली होती, असंही खासदार अमर काळे यांनी म्हटलं आहे.

खासदार अमर काळे यांनी जाहीरपणे बोलताना म्हटले की, ‘’आमच्याकडे सुद्धा लोकसभा निवडणुकीआधी काही लोक आली होती. ते म्हणाले की, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतकी-इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. दुनेश्वर पेठे यांच्याकडेही प्रस्ताव आला होता, की दोन कोटी रुपये तुम्ही द्या किती मतांनी तुम्ही निवडून याल हे आम्ही सांगतो आणि तेवढ्याच मतांनी तुम्ही निवडून याल.'’

शिवाय, ते राजकीय लोकं नव्हते कोणीतरी मध्यस्ताच्या माध्यमातून आले होते. मात्र या मार्गाने आम्हाला जायचेच नव्हते म्हणून आम्ही त्याच्या खोलात गेलो नाही. इतका पैसा जमवणं शक्य नव्हतं. मात्र ऑफर 100 टक्के आली मलाच नाही अनेक लोकांना आली होती. असंही काळे म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले? –

विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती. त्या दोन व्यक्तींची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली होती. त्यावेळी यामध्ये आपण पडायला नको, असे आम्ही ठरवलं.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : ट्रम्प यांच्या Dead Economy विधानावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा केलं भाष्य...प्रत्युत्तर देत म्हणाले...

Rail One OTT: आता तिकीट बुकिंग अॅपमध्ये चित्रपट आणि सिरीज मोफत पाहू शकाल, खास फीचर सुरू, कसं काम करणार?

Heart Surgery: 'मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या तत्परतेमुळे मयुरेशला नवजीवन'; हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याने वाचले प्राण

Jalgaon News : लाडक्या बहीण-भावांमुळे बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप; गर्दीमुळे जळगाव बसस्थानक हाऊसफुल्ल

Solapur Rain Update: 'साेलापुरमध्ये रात्री साडेआठपर्यंत ९.४ मिमी पाऊस'; आर्द्रता ९२ टक्क्यांवर, शहरात रात्री रिपरिप सुरुच

SCROLL FOR NEXT