coronavirus test 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती; 10 लाख लोकसंख्येमागे होतात केवळ 'इतक्या' चाचण्या...

मिलिंद तांबे

मुंबई : राज्य सरकारने आधीपासूनच देशात सर्वात जास्त चाचणी दर असल्याचा दावा केला आहे. 16 जुलै पर्यंत राज्यात कोरोनाच्या चाचणी करणाऱ्या 106  प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी 61 सरकारी आणि 44 खाजगी आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 198 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्या करणाऱ्या 22 राज्यांमध्ये महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा, त्रिपुरा, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रात चाचण्यांची संख्या कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेची स्थापना करणार असल्याचे सांगितले आहे. आणि त्यानुसार राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या 110 च्या वर गेली असल्याची माहिती दिली. देशात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या केवळ दोन इतकी होती. त्यानंतर वाढत्या लॅब सोबत चाचण्या वाढण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच्या अटही शिथिल करण्यात आली.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 10 लाख लोकसंख्येमागे 198 कोरोना चाचण्या घेण्यात येत असल्याचे यातून समोर आले. त्यामुळे कोरोना चाचण्यांसाठी इतक्या लॅब असूनही चाचणी संख्या इतकी कमी का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

24 जूनपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 73 कोरोना रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये 38,594 आयसोलेशन बेड, 5900 आयसीयू बेड आणि 2271 व्हेंटिलेटर आहेत. या  रुग्णालयांकडे आरोग्य सुरक्षा कर्मचारी आणि रूग्णांसाठी 2 लाख 84 हजार पीपीई कीट आणि 4 लाख 65 हजार 249 एन 95 मास्क उपलब्ध आहेत.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari announcement: नितीन गडकरींकडून महाराष्ट्र-कर्नाटकशी निगडीत मोठ्या प्रकल्पास मंजुरी!, आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार

Jalgaon News : जळगावात आमदारकीची जागा ३ वर्षांपासून रिक्त; जिल्हा परिषद निवडणुकांमुळे विधान परिषदेचा पेच कायम!

MPSC Exam Result : शेतकऱ्याच्या मुलीची उपविभागीय कृषी अधिकारीपदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध, अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा बोजवारा, रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग; कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT