Uday Samant Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh London esakal
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant : 'मी वाघनखांच्या जवळ होतो, तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून अंगावर..; सामंतांनी सांगितला थरारक अनुभव

येत्या काही दिवसांत ही वाघनखं महाराष्ट्रामध्ये येऊन जनतेला बघायला मिळणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

माझ्या लंडन दौऱ्यावर काही लोकांनी शंका उपस्थित केली. परंतु मी हा दौरा स्वखर्चातून केला आहे.

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनमधून (Waghnakh London) महाराष्ट्रात आणून जनतेला दाखविण्याचा यापूर्वी कधीच प्रयत्न झाला नव्हता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मला लंडनमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हे माझे परमभाग्य आहे, अशी प्रतिक्रिया लंडन दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (ता. ३) रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.

सामंत (Uday Samant) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यांचे नाव घेऊन अनेकांनी राजकारण केले. मला प्रामाणिकपणे नमूद केले पाहिजे की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावामुळे अनेकांना राग आला. परंतु त्या उठावाचे समर्थन केले नसते तर मी राज्याचा उद्योगमंत्री बनलो नसतो.

काम करण्याची संधी मला सरकारमध्ये मिळाली नसती. हा सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम असताना उद्योगमंत्र्याला त्यामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. येत्या काही दिवसांत ही वाघनखं महाराष्ट्रामध्ये येऊन जनतेला बघायला मिळणार आहेत. मी जेव्हा त्या वाघनखांच्या जवळ होतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून अंगावर रोमांच उभे राहिले होते.

वाघनख्याबाबत अभिमान

या वाघनख्याबाबत काही लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघनखं असा उल्लेख तेथे आहे. त्यांची आठवण म्हणून ही वाघनखे त्या म्युझियममध्ये आहेत. याचा अभिमान सगळ्यांनाच आहे, असेही सामंत यांनी अभिमानाने सांगितले.

'माझा लंडनचा दौरा स्वखर्चाने'

माझ्या लंडन दौऱ्यावर काही लोकांनी शंका उपस्थित केली. परंतु मी हा दौरा स्वखर्चातून केला आहे. माझे लंडनचे विमानाचे तिकीट माझ्या वडिलांनी काढले आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. परंतु २०२२ ला एमआयडीसीचा काही संबंध नसताना तत्कालीन ऊर्जामंत्री आणि पर्यटन मंत्री यांनी एमआयडीसीच्या खर्चाने परदेश दौरे केले. या परिस्थितीत मला हे आता जनतेला सांगितले पाहिजे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता हाणला.

सामंत म्हणाले, माझ्या लंडन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही शंका उपस्थित करत आज एक ट्विट आलं आणि त्या ट्विटमधून काही लोकांनी स्वतःचा पराभव मान्य केला. माझ्या घरामध्ये कोणीही सरपंच, आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख नाही. असे असताना माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला चार वेळा निवडून दिले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

मी ज्यावेळी मुख्यंमंत्री शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी काही लोकांना प्रचंड दुःख झालं, हे स्वीकारता आले नाही. म्हणून मी लंडनला जायचे निश्चित झाले आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला. त्यावेळी अनेकांनी टोमणे मारून टीका केली. मला सल्ले दिले की, मी देखील दौरा रद्द करावा. मात्र माझा दौरा निश्चित झाला. जे लोक आम्ही शासनाच्या पैशाने येथे आलोय अशी आमच्यावर टीका करत आहेत.

मी प्रामाणिकपणे सांगतो दोन-दोन आमदारांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन मी निवडून येत नाही, तर जनतेमध्ये जाऊन लोकांमध्ये राहून लोकांची विकास काम करून निवडून येतोय. मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली, तेव्हा २७ तारखेलाच माझ्या वडिलांनी माझ्या लंडनच्या प्रवासाचे तिकीट काढले.

त्याचा पुरावा, त्याचे चेक हे सगळे माझ्याकडे आहेत. काही लोक २०२२ ला एमआयडीसीचा काही संबंध नसताना ऊर्जामंत्री आणि पर्यटन मंत्री एमआयडीसीच्या खर्चाने परदेश दौऱ्यावर गेले हे कोणाला अजून सांगितले नव्हते ते सांगण्याची वेळ आली, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT