rain news sakal
महाराष्ट्र बातम्या

आज राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

आज राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

सकाळ डिजिटल टीम

सध्या पाऊस कधी पडणार असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय पण तुमची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण आज राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

शनिवारी कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. रत्नागिरी येथे सर्वांत जास्त पावसाची नोंद झाली. ९५ मिलिमीटर इतका पाऊस तिथे पडला. मात्र आज राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

केरळ किनारपट्टीवर पाऊस पडल्यानंतर राज्यात पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली होती मात्र अद्याप पुरेसा आणि समाधानकारक पाऊस पडल्याने राज्यातील शेतकरी राजा चिंतेत आहे.

अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम असून झारखंड ते विदर्भादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी विदर्भ आणि कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुणे शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. मात्र, शनिवारी शहरात पाऊस पडला नाही. शहरात सध्या सकाळी ढगाळ वातावरण, तर दुपारी ऊन, असे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती येत्या शुक्रवारपर्यंतअशीच राहील. परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. बुधवार आणि गुरुवारी घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे

ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या या जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla 18 Days in Space: शुभांशु शुक्लांनी अंतराळात १८ दिवस कसे घालवले, नेमकं काय-काय केलं अन् सोबत काय आणलं?

ICC World Cup 2025: आठ संघांच्या सराव सामन्याचे वेळापत्रक घोषित; यजमान टीम इंडिया 'या' दोन संघाविरुद्ध खेळणार

Epfo Rule: आता भाडे नाही, तर ईएमआय भरा! घर खरेदी करण्यासाठी पीएफ आर्थिक आधार देणार, ९० टक्के रक्कम मिळणार

क्रिती सेनॉन-जावेद जाफरीच्या इमारतीत घुसला अज्ञात व्यक्ती, बॅगेतली ती वस्तू लिफ्टमध्ये ठेवली आणि... 'त्या' कृत्यानं सोसायटीत खळबळ

Mumbai News: विद्यार्थ्यांची बससेवा बंद! मनपाच्या थकबाकीमुळे शिक्षणावर गदा, शिवसेनेचा इशारा

SCROLL FOR NEXT