Chandrashekhar Bavankule esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule : छत्रपती सेना ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष; 'असा' आहे बावनकुळेंचा राजकीय प्रवास

चंद्रशेखर बावनकुळे आता महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

चंद्रशेखर बावनकुळे आता महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्र भाजपचं (Maharashtra BJP) प्रदेशाध्यक्ष पद हे पूर्वी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडं होत. पण, नुकत्याचं झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर (Cabinet Expansion) चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद देण्यात आलं. तर, रिक्त असलेल्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Unit President) पदाची घोषणा करण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत, तर आशिष शेलारांकडं (Ashish Shelar) मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai City Chief) पदाची कमान सोपवण्यात आलीय. चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे भाजप नेते आहेत. बावनकुळे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे निकटवर्तीय मानले जाते.

Chandrashekhar Bavankule

कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर 2014 मध्ये नागपूरचे (Nagpur) पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बावनकुळेंनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2004, 2009, 2014 असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.

भाजप प्रवेशापूर्वी बावनकुळे छत्रपती सेनेचे अध्यक्ष होते

बावनकुळे हे भाजपमध्ये येण्यापूर्वी छत्रपती सेनेचे अध्यक्ष होते. बावनकुळे यांचा जन्म 13 जानेवारी 1969 रोजी नागपुरमधील कामठी तालुक्यातील खसाळा इथं झाला. आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात त्यांनी कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी संघर्ष केला होता. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे विरोधी पक्षनेते असताना नितीन गडकरी यांना पाठिंबा देत 1995 साली बावनकुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आलं होतं.

Chandrashekhar Bavankule

नागपूरच्या राजकारणात सक्रिय सहभाग

बावनकुळेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणाला सुरूवात केली. 1997 आणि 2002 साली ते नागपूर जिल्ह्यातील कोराडी क्षेत्रातून ते जिल्हा परिषद निवडणूक जिंकले. चंद्रशेखर बावनकुळे हे काही काळ भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष होते.

Chandrashekhar Bavankule

बावनकुळेंना 2019 मध्ये भाजपनं विधानसभेचं तिकीट नाकारलं

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं बावनकुळेंना भाजपनं 2019 ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं नाही, ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आलं, त्यांनी कामठी येथून निवडणुकीचा फॉर्म भरला. परंतु, शेवटच्या क्षणी फॉर्म भरल्यानंतर, ज्योती यांना भाजपनं एबी फॉर्म नाकारला होता. त्यामुळं बावनकुळेंना पाठिंबा देणारा तेली समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता. त्यानंतर नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बावनकुळेंना स्थान देण्यात आलं. बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेवारांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला होता.

Chandrashekhar Bavankule

विदर्भात भाजपचा ओबीसी चेहरा

विदर्भात ओबीसींची संख्या मोठी आहे. शिवाय, आगामी काळात विविध स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळं पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूनं विदर्भातील ओबीसी नेत्याला राज्यस्तरावर मोठं पद देणं भाजपला आवश्यक वाटल्याचं बोललं जातं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT