sayali sanjeev, sayali sanjeev news, ashok saraf, nivedita saraf, zee chitra gaurav 2023 SAKAL
मनोरंजन

Sayali Sanjeev: बापाकडून लेकीला खास भेट! अशोक आणि निवेदिता सराफ यांनी सायली संजीवसाठी..

निवेदिता आणि अशोक यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे

Devendra Jadhav

Sayali Sanjeev News: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रिन कपल. निवेदिता आणि अशोक यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे.

सायली सुद्धा अशोक - निवेदिता यांना आदर देत असते आणि त्यांच्याबद्दल प्रेम दर्शवत असते. नुकतंच अशोक सराफ आणि निवेदिता यांनी सायलीला एक खास भेट दिलीय. त्याविषयी सायलीने खुलासा केला.

(A special gift from Ashok saraf and Nivedita Saraf for Sayali Sanjeev on zee chitra gaurav 2023)

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सायली म्हणाली,"आज मी नेसलेल्या पैठणीची खासियत अशी आहे की, ही साडी मला अशोक पप्पा व निवेदिता मम्मा यांनी दिली आहे. त्यांनी ही साडी खास माझ्यासाठी विणून घेतली होती त्यामुळे ती माझ्यासाठी आणखीन स्पेशल आहे.

आतापर्यंत त्यांनी मला कधीही या साडीत पाहिलेलं नाही त्यामुळे ही खास साडी त्यांना दाखवायला नेसून आले आहे.” असा खुलासा सायलीने केलाय

सायलीने झी चित्र गौरव पुरस्कार २०२३ साठी खास निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने या खास सोहळ्या पैठणी साठी नेसलेल्या पैठणीचा पदर सोनेरी होता. ज्यात ती खुपच सुंदर दिसत होती. तिच्या लूकवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. तिच्या या मराठमोळ्या लूकमुळे ती या सोहळ्याचं आकर्षण ठरली होती. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले

अशोक पप्पा आणि निवेदिता ताईंनी सायलीसाठी ही खास साडी विणली आहे. सायली झी चित्र गौरव सोहळ्यात एकदम खुश होती.

काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात सायली कुणाच्या प्रेमात आहे याविषयी बऱ्याच चर्चा झाल्या पण प्रामुख्याने तीचं नाव जोडलं गेलं तर क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्याशी.. या अफवा इतक्या पसरल्या की सायलीला अखेर यावर स्पष्ट मत मांडून हे प्रकरण थांबवाव लागलं.

त्यांच्यात काहीही नसल्याची स्पष्टता सायलीने दिली. त्यामुळे सायली वारंवार तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत आली आहे. सायलीचे गेल्या काही महिन्यांमध्ये 'हर हर महादेव', 'गोष्ट एका पैठणीची', 'सातारचा सलमान' हे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi : 'ते शरद पवार यांचे झाले नाहीत, मग जनतेचे काय होणार?' खासदार असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर थेट हल्ला

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

Nanded Municipal Corporation Election : महापालिकेत यंदा कोणाला संधी? काँग्रेसला १३ वेळा महापौरपदाचा मान; शिवसेनेला एकदाच मिळाली संधी

'सुरज कुठे गेला?' बिग बॉसच्या रियुनियन पार्टीला सुरजला बोलवलं नाही? पाचही सीझनचे स्पर्धेक उपस्थित पण...

Mumbai Election Campaign : प्रचारासाठी गर्दीचा भाव वधारला! तासाभराच्या घोषणांसाठी मोजावे लागतायत १,००० रुपये!

SCROLL FOR NEXT