Aamir Khan and kareena kapoor-Khan Laal singh Chaddha Movie, aamir's Ex-wife kiran rao warned him about movie Google
मनोरंजन

Aamir Khan: लाल सिंग चड्ढा बनवतानाच आमिरची एक्स-वाईफ किरण रावनं दिलेला धोक्याचा इशारा; म्हणालेली...

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमामुळे अनेक वाद रंगले अन् त्यामुळं बॉक्सऑफिसवर सिनेमा दणकून आपटला.

प्रणाली मोरे

Aamir Khan:आमिर खान आणि करिना कपूर -खान यांचा लाल सिंग चड्ढा सिनेमा बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. सिनेमावर जितचे खर्च केले तितकं वसूल करणं देखील निर्मात्यांना कठीण होऊन बसलं होतं.आमिर खानचं हॉलीवूडच्या क्लासिक सिनेमाचा रीमेक करण्याची आयडिया बॉलीवूडमध्ये मात्र फेल ठरली. आमिर खानचं कितीतरी वर्षानंतर बॉलीवूडच्या सिल्व्हर स्क्रीनवरचं कमबॅकही सुपरफ्लॉप ठरलं.(Aamir Khan and karina kapoor-Khan Laal singh Chaddha Movie, aamir's Ex-wife kiran rao warned him about movie)

सिनेमाच्या कथेपासून,त्यातील संवाद आणि त्याच्या पंजाबी लहेजाला देखील ट्रोल केलं गेलं. तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेल पण सिनेमात भाषेचा पंजाबी लहेजा पकडण्यासाठी आमिर खाननं तब्बल ८ महिन्यापर्यंत ट्रेनिंग घेतली होती. पण नेमकं याच कारणानं आमिरला खूप ट्रोल केलं गेलं. खूप कमी जणांना माहित आहे की,आमिर खानची एक्स-वाईफ किरण रावने लाल सिंग चड्ढाविषयी त्याला आधीच वॉर्निंग दिली होती.

किरण राव जी लाल सिंग चड्ढाची निर्माती देखील आहे,तिनं नुकताच सिनेमातील अनेत छोट्या-मोठ्या गोष्टींविषयी खुलासे केले आहेत. आणि नेमकं त्याच वेळेस सिनेमातील बिहाइंड द सीन्स व्हिडीओ देखील समोर आला आहे,ज्यात आमिरनं म्हटलंय की भले सिनेमातील त्याची व्यक्तिरेखा शीख दाखवली गेली आहे पण तो एकदम परफेक्ट पंजाबी बोलताना दाखवलेला नाही कारण हा पंजाबा सिनेमा नव्हता.

आमिर खानने या व्हिडीओत सांगितलं आहे की जर लाल सिंग चड्ढा सिनेमातील व्यक्तिरेखा पंजाबी बोलताना दाखवली असती तर लोकांना सिनेमाच कळला नसता. त्यामुळे हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न सिनेमात केला गेला जेणेकरून लोकांना सिनेमा कळेल. व्हिडीओत आमिर खान पंजाबी संवाद बोलतानाचा सरावही करताना दिसत आहे. यादरम्यान किरण राव त्याला समजावताना दिसतेय की हा एक हिंदी सिनेमा आहे. या सिनेमातून तुम्हाला शक्य होईल तेवढी पंजाबी भाषा कमी करायला हवी.

किरण रावनं लाल सिंग चड्ढाच्या टीमला ईशारा दिला होता की, हा पंजांबी सिनेमा नाही आहे. या सिनेमाचं बजेट १८० करोड होतं पण या सिनेमानं जागितक स्तरावर केवळ १३० करोड इतकी कमाई केली. सिनेमाला ओटीटी रिलीजचं नुकसान देखील भोगावं लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT