Aamir Khan Laal singh Chaddha 1300 Shows And Akshay Kumar Rakshabandhan 1000 show reduced after low response Google
मनोरंजन

आमिर-अक्षयच्या अडचणीत वाढ; थिएटर मालकांनीही घेतला मोठा निर्णय

आमिरचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षयचा रक्षाबंधन गेल्या अनेक दिवसांपासून वादांमध्ये अडकले आहेत आणि सिनेमांना हवा तसा प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळत नाहीय.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha & Rakshabandhan Shows cancelled: आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' मध्ये होणाऱ्या धमाकेदार टक्करची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण आता वाटतंय की प्रेक्षकांना हे दोन्ही सिनेमे फार काही रुचले नाहीत. मिळालेल्या वृत्तानुसार,दोन्ही सिनेमांचे शोज थिएटर्स ओनर्सनी कमी केले आहेत.(Aamir Khan Laal singh Chaddha 1300 Shows And Akshay Kumar Rakshabandhan 1000 show reduced after low response)

बातमी आहे की सिनेमांच्या रिलीजच्या एक दिवसानंतरच थिएटर मालकांनी देशभरात दोन्ही सिनेमांचे स्क्रीनिंग कमी करुन टाकले आहेत. याचं कारण आहे प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, देशभरात आमिर खानच्या सिनेमाचे १३०० शो आणि अक्षय कुमारच्या सिनेमाचे १००० शो कमी करण्यात आले आहेत.

शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी दोन्ही सिनेमांचे कितीतरी शो कॅन्सल करण्यात आले होते. याचं कारण सिनेमा पहायला एकही प्रेक्षक फिरकला नाही. आणि हे असं सुरु असल्या कारणानं लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन च्या बॉक्सऑफिस कलेक्शनच्या कमाईचा आकडा पण खाली-खाली उतरताना दिसत आहे. दोन्ही सिनेमांच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईला देखील उतरतीच कळा लागलेली दिसली.

मीडिया रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं गेलं आहे की,जाणुनबुजून सिनेमांचे शो कमी केले जात आहेत,म्हणजे कमी स्क्रीन असल्यावर प्रेक्षकांच्या संख्येत वाढ दिसून येईल. बोललं जात आहे की,दोन्ही सिनेमे देशभरात १००० स्क्रीन्सवर रिलीज झाले होते. पण प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद पाहता थिएटर मालकांनी यांचे स्क्रिनिंगच कमी करुन टाकले,म्हणजे त्यांचा होणारा खर्च वाचेल.

दोन्ही सिनेमांच्या कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर, लाल सिंग चड्ढाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जवळपास १२ करोडचा बिझनेस केला, तर रक्षाबंधनने ९ करोडच्या आसपास कमावले. दुसऱ्या दिवशी ३५ ते ४० टक्क्यांचा ड्रॉप लाल सिंग चड्ढा च्या कलेक्शनमध्ये पहायला मिळाला. आणि दुसऱ्या दिवशीची कमाई १८ ते १९ करोड दरम्यान झाली. तर तिकडे अक्षय कुमारच्या रक्षाबंधनने देखील दुसऱ्या दिवशी फक्त ७ करोडची कमाई केली.

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा, हॉलीवूडच्या फॉरेस्ट गम्पचा रीमेक आहे. या सिनेमात आमिर सोबत करिना कपूर आणि मोना सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमारच्या रक्षाबंधनमध्ये हुंड्याची प्रथा या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात भूमी पेडणेकर आणि सादिया खतीब या देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT