Aamir Khan wanted son Junaid to play the lead in Laal Singh Chaddha, here’s why it didn’t happen Google
मनोरंजन

...तर आमिर नाही त्याचा मुलगा जुनैदने साकारला असता लाल सिंग चड्ढा, पण...

आमिर खानने नुकतेच एका मुलाखतीत लाल सिंग चड्ढासंदर्भात मोठा खुलासा करुन सगळ्यांनाच चकित केलं आहे.

प्रणाली मोरे

सुपरस्टार आमिर खान(Aamir Khan) आपल्या आगामी 'लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) सिनेमाविषयी खूपच उत्सुक आहे. एका मोठ्या काळानंतर आमिर सिल्व्हर स्क्रीनवर परत येत आहे. सिनेमात आमिर एका सरदारच्या लूकमध्ये दिसणार आहे. सिनेमातील आपल्या लूकमागची स्टोरी सांगताना आमिर याविषयी खुलासा करत म्हणाला आहे,''सिनेमा एकाक्षणी त्याच्या हातातून निघून गेल्यातच जमा होता. कारण टीममधील ९० टक्के लोकांना वाटत होतं या सिनेमात लाल सिंग चड्ढाची भूमिका जुनैदनं(Jaunaid Khan),म्हणजे माझ्या मुलानं करायला हवी.(Aamir Khan wanted son Junaid to play the lead in Laal Singh Chaddha, here’s why it didn’t happen)

आमिर म्हणाला,''या सिनेमाची कथा आणि व्यक्तिरेखा या पूर्ण अतुल कुलकर्णीनं ठरवल्या आहेत. त्यानंच या भूमिकेला सरदारचा लूक असावा हे सूचवलं. मी एकदा जीम मध्ये एका सरदारला भेटलो,तेव्हा मला त्याची पर्सनॅलिटी खूपच आवडली. मी त्याला पटकन विचारुन टाकलं की मी तुमचा एक फोटो क्लिक करू शकतो का? त्याला हे देखील समजावून सांगितलं की माझ्या आगामी सिनेमात मी एका सरदारच्या लूकमध्ये दिसणार आहे. आणि मला तुमचा हा लूक खूप आवडला आहे,तर मी तो माझ्या सिनेमासाठी फॉलो करणार आहे. तेव्हा त्या सरदारने माझी खूप मदत केली. आणि मग तिथूनच मी माझी दाढी देखील वाढवायला सुरुवात केली''.

आमिर पुढे म्हणाला,''मला दाढी वाढवण्यासाठी खूप वेळ लागला. आणि मध्येच काही कारणानं मला दाढी कापावी लागली. कारण सिनेमाचे हक्क मिळवण्यात मध्ये खूप कालावधी गेला. पण पुढे मग बाकीची सर्व तयारी,पेपरवर्क करण्यात दीड वर्षाचा कालावधी गेला,आणि मग त्या दरम्यान पुन्हा माझी दाढी चांगली वाढली. त्याचवेळी माझा मुलगा जुनैद परदेशातून थिएटरचा कोर्स करुन भारतात परतला होता. आणि तो सिनेमाचं शूट सुरू होण्याआधी जे म्हत्त्वाचं काम सुरु असतं त्या दरम्यानच परतला होता''.

मी दिग्दर्शक अद्वैतला म्हणालो की,'' हा सिनेमा खूपच अवघड आहे, मला कमीत कमी याचे ६ ते ७ सीन्स टेस्ट म्हणून हवे आहेत. तू कोणाकडून तरी शूट करून घे. मला शूट करुन दाखवा म्हणजे तुम्ही सगळे हा विषय व्यवस्थित हॅंडल करु शकता की नाही हे मला कळेल. मीच त्यानं जुनैदला,माझ्या मुलाला लाल सिंग चड्ढा बनवून शूट कर असा सल्ला दिला. मला वाटलं यातनं दोन गोष्टी होतील. मुलगा काय शिकून आलाय बाहेरुन हे देखील कळेल आणि दिग्दर्शक सिनेमा कसा शूट करणार आहे याची देखील परिक्षा घेतली जाईल''.

आमिर पुढे म्हणाला,''जेव्हा दोन आठवड्यांनी मी जुनैदची स्क्रीन टेस्ट पाहिली तेव्हा मी आणि किरण ते पाहून हैराण झालो. आम्ही अद्वैतचं काम पाहत होतं,पण मनात भरला लाल सिंग साकारणारा माझा मुलगा जुनैद. मी माझ्या मुलाला पहिल्यांदा पडद्यावर परफॉर्म करताना पाहत होतो. आणि खरंच मला तिथे जुनैद नाही,तर लाल सिंग चड्ढाच दिसत होता. आणि माझ्या मनात क्रिएटिव्ह विचार सतावू लागला की मी आता लाल सिंग चड्ढा करू शकणार नाही. किरण देखील कन्फ्यूज होती. ती म्हणाली, तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे पण जुनैदने लाल सिंग चड्ढाचा सूर एकदम व्यवस्थित पकडला आहे. आणि मग मी देखील विचार करायला लागलो, माझ्यानं काही आता ही भूमिका व्हायची नाही''.

''मी माझ्या आणखीन काही ५० ते ६० क्रिएटिव्ह मित्रांना ते दाखवलं. आणि त्यातील ९८ टक्के लोकांचे म्हणणे होते की लाल सिंग चड्ढाची भूमिका जुनैदने करायला हवी. फक्त दोन लोकांनी याला 'नाही' म्हटलं. एक आदित्य चोप्रा आणि दुसरा अतुल कुलकर्णी. त्यांना वाटत होतं की कोणत्याही नवोदीत कलाकारानं ही भूमिका साकारू नये. या भूमिकेला कॅरी करायला कोणीतरी स्टार हवा. मी तर या सगळ्या प्रकरणात माझी दाढी सुद्धा वाढवलेली काढून टाकली होती. मी धरुनच चाललो होतो की लाल सिंग चड्डा जुनैद करणार. पण शेवटी लेखकाच्या विश्वासाच्या विरोधात मी जाऊ शकलो नाही. आणि मग आदित्य,अतुलच्या विश्वासाचा आदर राखत मी सिनेमा करायचं ठरवलं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 squad: शुभमन गिलला संघातून का वगळले? अजित आगरकर, सूर्यकुमार यादव एक सूरात म्हणाले, संघहित...

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT