abhidnya bhave, abhidnya bhave news SAKAL
मनोरंजन

Abhidnya Bhave: अभिज्ञा भावे अबूधाबीतील प्रसिद्ध मशिदीत कुटुंबासोबत फोटो व्हायरल..चर्चांना उधाण

अभिज्ञाने खास अंदाजात मशिदीला भेट दिली.

Devendra Jadhav

Abhidnya Bhave News: अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अभिज्ञाचे फोटो, व्हिडिओ आणि मालिका तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात. अभिज्ञा सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे अभिज्ञा भावे दुबईतील मशिदीत गेली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

अभिज्ञा तिचा नवरा मेहुल पै सोबत अबू धाबी मधील प्रसिद्ध अशा शेख झायेद ग्रँड मशिदीत गेली. तिथे अभिज्ञाने नवरा मेहुल पै आणि सासू सोबत खास फोटोशूट केलं. अभिज्ञाने खास अंदाजात मशिदीला भेट दिली.

अभिज्ञाच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी कमेंट केली आहे. अभिज्ञा आणि मेहुलच्या या फोटोंवर लव्ह रिॲक्ट करून चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

अभिज्ञाने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी कॅरी केलीय. मेहुलने सुद्धा अभिज्ञाला मॅचींग असं राखाडी रंगाचा शर्ट घातला आहे. दुबईतील झायेद ग्रँड मशिद ही मुस्लिम धर्मियांसाठी श्रद्धास्थान आहे.

अभिज्ञा सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करत नाहीये. त्यामुळे सध्या ती कुटुंबाला वेळ देतेय. त्यामुळे अभिज्ञाने नवरा आणि सासू सोबत दुबईमध्ये भटकंती केली.

२०२२ हे वर्ष अभिज्ञा भावे साठी खूप संघर्षदायी ठरलं. मेहुलला कॅन्सरचं निदान झालं आणि अभिज्ञाच्या पायाखालची जमीन सरकली.

मेहुल अक्षरशः मरणाच्या दारातून परत आला. मेहुलचे कॅन्सरवर यशस्वी उपचार झाले. मेहुलच्या या संघर्षमय प्रवासात पत्नी म्हणून अभिज्ञा खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती.

मेहुलच्या आजारपणाच्या काळात अभिज्ञा तू तेव्हा तशी मालिकेत अभिनय करत होती. मालिकेचं शूटिंग आणि मेहूलचा आजार अशी दुहेरी कसरत अभिज्ञाने केली. या काळात अभिज्ञाचं कुटुंब आणि तिचे फॅन्स तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आता सर्व काही सुरळीत झालं असल्याने अभिज्ञा आणि मेहुल दोघेही खुश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील अपघाताची मालिका काही थांबेना! मध्यरात्री सात ते आठ गाड्यांचा विचित्र अपघात; पाहा VIDEO

पती रस्त्यावर तडफडत होता, पत्नीने हात जोडले तरी कुणी थांबलं नाही, रुग्णालयात नेण्याआधी मृत्यू

Ladki Bahin Yojana: १७ तारीख उजाडली, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे नाहीत… नेमका अडथळा कुठे? मोठी अपडेट समोर

Mumbai News: मराठी माणसा... जागा हो, मुंबई वाचव..! अज्ञाताकडून शहरात ठिकठिकाणी फलकबाजी; राजकीय वर्तुळात खळबळ

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

SCROLL FOR NEXT