Actor Jason Momoa Survives Crash. This is what happened Google
मनोरंजन

Game Of Thrones फेम जेसन मोमोआच्या कारला अपघात, थोडक्यात बचावला अभिनेता

Game Of Thrones अभिनेता जेसन मोमोआच्या कारला दुचाकीस्वारानं समोरुन येऊन जोरात ठोकर दिल्याची बातमी आहे.

प्रणाली मोरे

Game Of Thrones अभिनेता जेसन मोमोआ (Jason Momoa) हा कार अपघातातून(Car Accident) थोडक्यात बचावला आहे. हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा अभिनेता कॅलिफोर्नियात आपली ओल्डस्मोबाईल कार चालवत होता. अभिनेत्याला अपघातात फार गंभीर दुखापत झाली नाही अशी बातमी आहे. पण त्याच्या कारला मोटारसायकल ठोकणाऱ्याला दुखापत झाली असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचा पाय जखमी झाल्याचे कळत आहे. तो जखमी मोटरसायकल चालवणारा इसम जेसन मोमोआच्या दिशेने येत होता. आणि त्याने अभिनेत्याच्या ओल्डस्मोबाईल कारला समोरुन येऊन ठोकर दिली. आणि त्यानंतर धाडकन जमिनीवर कोसळला. या अपघातात जेसन मोमोआ देखील थोडक्यात बचावला असं म्हटलं जात आहे,अन्यथा चेहऱ्याला मार लागण्याची शक्यता होती. वृत्तानुसार कळत आहे की, या अपघातात मोटार सायकल चालवणाऱ्याकडून जेसनच्या गाडीचं देखील नुकसान झालं आहे.(Actor Jason Momoa Survives Crash. This is what happened)

हा अपघात जेसन मोमोआसाठी एक चांगलीच शिकवण ठरू शकतो. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेसन मोमोआने आपल्या मोटरसायकल सवारीचे कितीतरी फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले होते. ज्यामध्ये नॅशविलेच्या त्याच्या एका ट्रीपच्या सिरीजचा देखील समावेश आहे. यावरुन आपल्याला कळेल की अभिनेत्याला मोटारसायकलचं भलतंच वेड आहे. तो नेहमीच आपल्या बाईकसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

जेसन मोमोआच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो सध्याFast X सिनेमात खलनायक पात्र रंगवताना दिसणार आहे. एप्रिलमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू झालं, अद्यापही शूटिंग सुरू असल्याची बातमी आहे.

या सिनेमात मिशेल रोड्रिगेज,रीटा मोरेनो, ब्री लार्सन, विन डीजल, जेसन स्टैथम, डेनिएला मेलचियर, जॉन सीना, चार्लीज़ थेरॉन, सुंग कांग, जोर्डाना ब्रूस्टर असे कलाकार काम करत आहेत. Fast X हा जेसन मोमोआ काम करत असलेला सिनेमा १९ मे,२०२३ रोजी रिलीज होणार आहे.

जेसन मोमोआच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो सध्या फास्ट एक्स सिनेमात खलनायक पात्र रंगवताना दिसणार आहे. एप्रिलमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू झालं, अद्यापही शूटिंग सुरू असल्याची बातमी आहे. या सिनेमात मिशेल रोड्रिगेज,रीटा मोरेनो, ब्री लार्सन, विन डीजल, जेसन स्टैथम, डेनिएला मेलचियर, जॉन सीना, चार्लीज़ थेरॉन, सुंग कांग, जोर्डाना ब्रूस्टर असे कलाकार काम करत आहेत. Fast X हा जेसन मोमोआ काम करत असलेला सिनेमा १९ मे,२०२३ रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT