Adipurush BJP Propaganda Ramayan Actor Arun Govil Angry esakal
मनोरंजन

Adipurush: 'आदिपुरुष भाजपचा प्रोपगंडा', टीव्ही मालिकेतल्या 'रामानं' सोडला बाण!

रामानंद सागर यांची निर्मिती असलेल्या रामायण या मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल हे अजूनही प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत.

युगंधर ताजणे

Adipurush BJP Propaganda Ramayan Actor Arun Govil Angry : टीव्ही मनोरंजन विश्वात रामानंद सागर यांचे नाव अजरामर झाले आहे. त्याला कारण म्हणजे रामायण आणि महाभारत मालिका. या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनातील सर्वाधिक आवडीच्या मालिका आहेत. कोरोनाच्या काळात देखील या मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी देखील त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड असल्याचे दिसून आले होते.

रामानंद सागर यांची निर्मिती असलेल्या रामायण या मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल हे अजूनही प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. त्यांनी जेव्हा सध्या तुफान चर्चेत असलेला ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट पाहिला त्यानंतर संताप व्यक्त केला होता. याचित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांची ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.अरुण गोविल यांची ती तिखट प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. Adipurush BJP Propaganda Ramayan Actor Arun Govil Reaction

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

गोविल यांच्या मते तुम्ही जेव्हा आदिपुरुष सारख्या चित्रपटांची निर्मिती करत असता तेव्हा लोकांच्या भावनांचा विचार अधिक महत्वाचा आहे. क्रिएटिव्ह लिबर्टी, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे काही करता ते लोकांच्या रागाचे कारण ठरते. आदिपुरुषवरुन दिसून आले आहे. त्यामध्ये जे काही प्रेक्षकांपुढे आले आहे त्यातून वेगळीच वातावऱण निर्मिती होते. प्रेक्षकांना आपण काय सांगतो, काय मांडतो हे महत्वाचे आहे, प्रेक्षकांनी तर ओम राऊतवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

आदिपुरुषमधील संवाद हे कमालीचे बालिश असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. कलाकार, त्यांची वेशभूषा,रंगभूषा यामुळे चित्रपटाचे महत्व दिग्दर्शकालाच किती आहे हे दिसून येते. यावरुनही नेटकऱ्यांनी आदिपुरुषवर निशाणा साधला आहे. आता गोविल यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळता कामा नये. त्यामुळे आपल्या पदरी निराशाच येते हे लक्षात घ्यावे.

रामायण हा आपल्याकरिता संवेदनशील विषय आहे. मात्र निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासाठी तो प्रोपगंड्याचा विषय आहे. असे म्हणावे लागेल. हा चित्रपट बीजेपीचा प्रोपगंडा आहे. असा थेट आरोप गोविल यांनी केला आहे. अमर उजालामध्ये आलेल्या बातमीमध्ये गोविल यांनी केलेला आरोप हा आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आदिपुरुषच्या निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानजींसाठी एक सीट आऱक्षित करणे ही एक राजकीय खेळी होती. असेही गोविल यांनी म्हटले आहे.

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेमध्ये श्रीरामाची भूमिका करणाऱ्या गोविल यांच्या परखड वक्तव्यानं तर आता वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना यांनी देखील ओम राऊत यांच्या चित्रपटावर कडाडून टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

Virat-Anushka Meet Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज यांनी विराट-अनुष्काला सांगितला रावणाच्या मृत्यूनंतरचा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

SCROLL FOR NEXT