adipurush day box office collection day 5 prabahs, kriti sanon saif ali khan om raut  SAKAL
मनोरंजन

Adipurush Box Office Collection Day 5: विरोध वाढला कमाई थंडावली! आदिपुरुष 'चक्रव्यूह'मध्ये फसला...

Vaishali Patil

Adipurush Box Office Collection Day 5: रामायणवार प्रेरित असलेला आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाल्यापासून वादात अडकला आहे. प्रदर्शनापुर्वी या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खुप साऱ्या अपेक्षा होत्या मात्र त्या सर्व भंग झाल्याचा सोशल मिडियावरील रिव्हूवरुन लक्षात येत आहे.


लोक चित्रपटातील संवाद आणि VFX आणि कलाकारांच्या लुकबद्दल नाराज आहेत. त्यामुळे चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशातच या नाराजीचा फटका चित्रपटाच्या प्रदर्शनावर बसला आहे.

आदिपुरुषच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस खाली जातांना दिसत आहे.

वीकेंडला सर्व विक्रम तोडणारा ओम राऊतचा आदिपुरुष चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर फारच थंडावला आहे. चित्रपटावर होणाऱ्या टीकेचा परिणाम खुप मोठा कमाईवर होत आहे. आता मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत जे सर्वात कमी आहे.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी फक्त 10.80 कोटी कमावले, त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई आता 247.90 कोटींच्या जवळपास गेली आहे. त्यामुळे या अंदाजे आकड्यांमध्ये थोडे बदल होऊ शकतात.

तब्बल 600 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या आदिपुरुष हा बिग बजेट सिनेमांपैकी एक आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने जवळपास 400 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे पदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट भरमसाठ कमाई करेल अशी आशा असलेला हा चित्रपट आता लवकरच बॉक्स ऑफिसवरुन काढता पाय घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटाच्या प्रभासने राघवची भूमिका साकारली आहे. क्रिती सेनॉनने जानकीची तर सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे, देवदत्त नागने हनुमानाची आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT