Bholaa Motion Poster Ajay Devgan Esakal
मनोरंजन

Bholaa Trailer Out: राक्षसांचा नाश करण्यासाठी येतोय Bholaa! अजय बॅक टु अ‍ॅक्शन मोड..सस्पेंस रोमान्स थ्रिलर Trailer Out

सकाळ डिजिटल टीम

Bholaa Trailer Out: अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'भोला'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. आज सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

भोलामध्ये, अजय देवगण एका गुन्हेगाराच्या भूमिकेत आहे. जो गुन्हेगारांच्या टोळीपासून अंमली पदार्थाचे संरक्षण करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यासोबत (तब्बू) सामील होतो.यात अजय फुल अ‍ॅक्शन मोड मध्ये दिसत आहे.

अजयचा लूक हे चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण आहे. तुफानी अॅक्शन आणि त्याला मसाला मनोरंजनचाही सामावेश भोलाचा ट्रेलर दिसत आहे.

हा चित्रपट अॅक्शन, थ्रिल आणि इमोशने भरलेला आहे. चित्रपटात अजय एका कैद्याच्या भूमिकेत आहे, तर तब्बू पोलिसाच्या भूमिकेत आहे. 'दृश्यम 2' नंतर अजय आणि तब्बूला पुन्हा पडद्यावर एकत्र पाहणे ही चाहत्यांसाठी मोठी भेट आहे.

यामध्ये दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि संजय मिश्रा यांचा समावेश आहे. अमला पॉल आणि अभिषेक बच्चन यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. संगीत केजीएफ संगीतकार रवी बसरूर यांचे असून छायाचित्रण असीम बजाज यांचे आहे.

'भोला' चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर अजय देवगण याच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही पार पाडत आहे. तो या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. विशेष म्हणजे 'भोला' हा तमिळ चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभिनेता कार्ती दिसला होता. भोलाशिवाय अजय देवगणही मैदान या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT