Emraan Hashmi esakal
मनोरंजन

Emraan Hashmi: 'पिक्चर तर नाही सेल्फी काढुन घेऊ', इमरान हाश्मी अन् ऐश्वर्याचा फोटो व्हायरल

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अक्षय कुमार सध्या त्यांच्या सेल्फीमुळे खूप चर्चेत आहेत. नुकतचं त्यांच्या 'सेल्फी' चित्रपटाचं मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले. आता दोन्ही स्टार्स एकत्र येत खूप मस्ती करताना दिसत आहेत.

सध्या हे दोघ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याची आणि ऐश्वर्या रायसोबतची सेल्फी. इमरान आणि अक्षय कुमारने हा सेल्फी पोस्ट केलाय, जो खूप व्हायरल होत आहे. या सेल्फीमध्ये दोघेही ऐश्वर्या रायसोबत दिसत आहेत.

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर इमरान आणि ऐश्वर्या रायसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. मात्र, या फोटोमध्ये ऐश्वर्या नसून फक्त तिचे पोस्टर आहे.

अक्षयने गंमतीत लिहिले, 'जेव्हा मी आणि इमरान हाश्मी काले काले नैनाला आमच्या काळ्या-काळ्या कपड्यांशी जुळवण्याचा प्रयत्न केला.' यासोबत त्याने ऐश्वर्याला टॅगही केले. पोस्टर ऐश्वर्याच्या 'बंटी और बबली' चित्रपटातील 'कजरा रे' गाण्याचे आहे.

फक्त अक्षय कुमारच नाही तर इमरान हाश्मीनेही ऐश्वर्या रायच्या चाहत्यासारखी पोस्ट शेअर केली आहे. त्यात इमरान हाश्मीने लिहिले, 'तिच्यासोबत नाही तर त्याच्या फोटोसोबत सेल्फी..' इम्रानच्या या पोस्टवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत.

एका यूजरने मजेशीरपणे लिहिले की, 'अभिषेकने फोन केला होता, तो घरातून निघून गेला आहे, आता बघं.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'घरी गेल्यावर तुम्हा दोघं हसणं विसरून जाल.'

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा 'सेल्फी' पुढील महिन्यात 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्की आणि इम्रान व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत. बातम्यांनुसार, असेही सांगण्यात येत आहे की अक्की आणि इमरानच्या या सेल्फी चित्रपटाचा ट्रेलर येत्या 19 जानेवारीला रिलीज होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT