Aarav Bhatiya  esakal
मनोरंजन

Aarav Bhatiya : 'बाळा आयडी दाखव अन् जा, कुणाचा मुलगा सांगू नको!' अक्षय कुमारच्या आरवला सुरक्षारक्षकांनी टोकलं

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akshay Kumar Bollywood Actor Son Aarav Bhatiya : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याला विमानतळावर सुरक्षारक्षकांनी थांबवले. त्याच्याकडे काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बऱ्याचदा सेलिब्रेटींच्या मुलांना विमानतळावरील सिक्युरिटीकडून फारसा त्रास दिला जात नाही. अनेकदा त्यांना लवकर आत सोडलेही जाते. मात्र काही वेळेला सुरक्षारक्षकांनी विचारले जाते. तेव्हा त्यांनाही प्रोटोकॉल फॉरवर्ड करावे लागतात. असे दिसून आले आहे.

Also Read - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सेलिब्रेटींच्या मुलांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्यांच्याकडे अनेकदा आयडीही मागितले जात नाही. आता अक्षय कुमारच्या मुलाला गेटवर थांबवल्यानं आणि त्याच्याकडे डॉक्युमेंट्स मागितल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याला बराचवेळ थांबावे लागल्याचे सांगण्यात आले आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

जशी आरवची इंट्री झाली तसं त्याला गेटवर थांबवण्यात आले. आणि त्याच्याकडे सुरक्षारक्षकांनी ओळखपत्र आणि संबंधित कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांकडून ग्रीन सिग्नल येईपर्यत बराच वेळ वाट पाहावी लागली. सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण तपासणी केली नव्हती. त्यामुळे त्याला आतमध्ये जाऊ देण्यास मज्जाव करण्यात आला होता.

आरवच्या लूकविषयी सांगायचे झाल्यास तो विमानतळावर येताच पापाराझींनी त्याचे फोटो घेण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मोठी गर्दीही झाला होती. आरवनं बॅगी डेनिम पँट सोबत डार्क निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्यानं मास्कही घातला होता. आरव हा युकेमध्ये शिक्षण घेतो आहे. त्याला थांबवल्याप्रकरणी सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : पंतप्रधान मोदींचे शपथविधी स्थळावर आगमन

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

माधुरी दीक्षितचा नवा अंदाज, 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार धकधक गर्ल, साकारणार सीरियल किलरची भूमिका

SCROLL FOR NEXT