Akshay Kumar on Flop Movies at the boxoffice, if my films are not working its my fault.
Akshay Kumar on Flop Movies at the boxoffice, if my films are not working its my fault. Google
मनोरंजन

रक्षाबंधनही फ्लॉप झाला तसा अक्षयनं बदलला सूर; म्हणाला,'मी चुकलो,यापुढे...'

प्रणाली मोरे

Akshay Kumar: सध्या अक्षय कुमारसारखा पक्का बॉलीवूडचा खिलाडीही बॉक्सऑफिसवर स्ट्रगल करताना दिसत आहे. पहिल्यांदा 'बेलबॉटम',मग 'बच्चन पांडे', त्यानंतर 'सम्राट पृथ्वीराज' आणि आताचा रक्षाबंधन असे एकामागोमाग त्याच्या मोठ्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर अक्षरशः नांगी टाकली. यामुळे आता अक्षयकुमारनं निर्णय घेतला आहे की,त्याचा आगामी सिनेमा 'कठपुतली' तो थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज करेल. 'कठपुतली'च्या ट्रेलर लॉंच दरम्यान अक्षयचे सूर सर्वांनाच बदललेले वाटले. तो बॅक टू बॅक सिनेमे फ्लॉप होण्याविषयी, ओटीटीच्या ट्रेन्डविषयी आणि इतर अनेक विषयांवर मनमोकळेपणाने बोलताना दिसला. त्यानं पत्रकारांशी बातचीत करताना स्पष्ट केलं की जर त्याचे सिनेमे चालत नाहीत तर यात त्याचेच कुठेतरी चुकत आहे.(Akshay Kumar on Flop Movies at the box office, if my films are not working its my fault).

गेल्या कही मुलाखतीत अक्षय कुमार ट्रोलर्सविषयी बोलताना थोडा रागातच वाटला. त्यानं म्हटलं होतं की,''जे लोक त्याला कॅनडा कुमार बोलतात किंवा आणखी कोणत्या कारणाने ट्रोल करतात,त्यामुळे त्याला काहीच फरक पडत नाही''. पण नुकत्याच झालेल्या 'कठपुतली' च्या ट्रेलर लॉंच दरम्यान अक्षयचे सूर मात्र बदललेले दिसले. पत्रकारांनी अक्षयवर त्याचे बॅक टू बॅक फ्लॉप होणारे सिनेमे आणि त्यानंतर त्यानं सिनेमा रिलीजसाठी निवडलेला ओटीटीचा सुरक्षित पर्याय याविषयीच्या प्रश्नांचा मारा केला. तेव्हा न चिडता अक्षयने खुप नम्रपणे आपल्या आणि इतर कलाकारांच्या चुकांचा चक्क पाढा वाचला.

अक्षय कुमार म्हणाला की,''जर आमचे सिनेमे चालत नाहीत तर यात आमचीच चूक आहे. माझी चूक आहे. मला हे समजायला हवं की प्रेक्षकांना माझ्याकडून नेमकं काय हवं आहे. मला स्वतःला बदलायला हवं,यापुढे माझ्यात बदल करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ओटीटी विषयी बोलायचं झालं तर हे लोकांच्या अतिशय जवळचं माध्यम आहे. आणि आम्ही सिनेमे लोकांसाठी बनवतो,ते आमचं काम आहे, म्हणून लोकांच्या जवळच्या माध्यमावर मी सिनेमा रिलीज करत आहे''.

अक्षयनं त्याचे सिनेमे एकदम बॅक टू बॅक रिलीज केले. मार्चमध्ये 'बच्चन पां'डे,जूनमध्ये 'सम्राट पृथ्वीराज' तर ऑगस्टमध्ये 'रक्षाबंधन'. याचविषयी 'कठपुतली' च्या पत्रकार परिषदेत अक्षयला प्रश्न विचारला गेला की,'दोन सिनेमांमध्ये रिलीजसाठी किती अंतर असायला हवं?' यावर अक्षय म्हणाला की, ''कोरोनामुळे कितीतरी सिनेमे रिलीज होऊ शकले नाही. खूप सिनेमे त्यामुळे रखडले. जर कोरोना नसता तर असं झालं नसतं. माझे स्वतःचे चार सिनेमे तयार आहेत,पण रिलीज नाही झाले. आणि म्हणून आता सिनेमे बॅक टू बॅक रिलीज होत आहेत. नाहीत एरव्ही ३ ते ४ महिन्यांचे अंतर दोन सिनेमांमध्ये हवं''.

'कठपुतली' मध्ये अक्षय कुमार सोबत रकुलप्रीत सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २ डिसेंबर २०२२ रोजी डिस्ने+हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन रंजीत तिवारीनं केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT